फलकाच्या वादावरून पुण्यातील कोरेगाव भीमा परिसरात दोन गटात दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 02:23 PM2018-01-01T14:23:40+5:302018-01-01T14:40:41+5:30
वढू बुद्रुक येथे (दि. २९) नामफलकावरून वाद उद्भवला होता. यामुळे येथे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र पोलिसांच्या मध्यस्थीने आता शांतता असल्याचे समजते.
Next
ठळक मुद्देदगडफेकीच्या घटनेत १० ते १५ वाहनांची जाळपोळकोरेगाव वढू, सणसवाडी, शिक्रापूर, पेरणे ही महामार्गावरील गावे बंद
कोरेगाव भीमा : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पुणे-नगर रोडवर कोरगाव भीमा ते पेरणे फाटा दरम्यान सोमवारी सकाळी ११.३०पासून दोन गटात दगडफेकीच्या घटना घडल्या. वढू बुद्रुक येथे (दि. २९) नामफलकावरून वाद उद्भवला होता. यामुळे येथे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र पोलिसांच्या मध्यस्थीने आता शांतता असल्याचे समजते.
या दगडफेकीच्या घटनेत १० ते १५ वाहनांची जाळपोळ झाले आहे. दरम्यान तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याने कोरेगाव वढू, सणसवाडी, शिक्रापूर, पेरणे ही महामार्गावरील गावे बंद ठेवण्यात आली आहेत.