Pune Crime | रंगपंचमी रंग खेळताना वाद; बालाजीनगरमध्ये तरुणावर कोयत्याने केले वार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 09:35 AM2023-03-15T09:35:43+5:302023-03-15T09:40:02+5:30

ही घटना धनकवडीतील बालाजीनगर येथील तोरणा हाईट्ससमोर रविवारी रात्री साडेनऊ वाजता घडली

Controversy while playing Rangpanchami colors; A youth was attacked by a coyote in Balajinagar | Pune Crime | रंगपंचमी रंग खेळताना वाद; बालाजीनगरमध्ये तरुणावर कोयत्याने केले वार

Pune Crime | रंगपंचमी रंग खेळताना वाद; बालाजीनगरमध्ये तरुणावर कोयत्याने केले वार

googlenewsNext

पुणे : रंगपंचमी साजरी करीत असताना एकमेकांकडे पाहण्यावरून टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी अक्षय शांतीनाथ दिवाणे (वय २४, रा. संतोषनगर, कात्रज) याने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शेंडी शेंडकर, राजकुमार परेदशी, ऋषी भगत, अल्ताफ शेख, सुफियान शेख, दिनेश फाळके व त्यांचे साथीदार (सर्व रा. बालाजीनगर, धनकवडी) यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना धनकवडीतील बालाजीनगर येथील तोरणा हाईट्ससमोर रविवारी रात्री साडेनऊ वाजता घडली.

अधिक माहितीनुसार, फिर्यादी व तिचा मित्र जय पवार, ओम पवार हे रंगपंचमी साजरी करत असताना त्यांच्या ओळखीचे आरोपी तेथे आले. त्यांनी ओम पवार याला तू कोठे राहतो, येथे काय करतो, असे म्हणून वाद घालत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ओम याला ते मारहाण करू लागले. तेव्हा त्याला सोडविण्यासाठी फिर्यादी व जय पवार गेले असता त्यांना मारहाण करून जखमी केले. फिर्यादी यांना वाचविण्यासाठी आलेल्या इतर नागरिकांना हत्यारे दाखवून दहशत निर्माण केली. पोलिस उपनिरीक्षक मुलाणी तपास करीत आहेत.

Web Title: Controversy while playing Rangpanchami colors; A youth was attacked by a coyote in Balajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.