पुण्याच्या ग्रामीण भागातील जनमाणसाचा प्रवास सोयीस्कर; पीएमपी कडून २३ मार्ग सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 04:32 PM2022-12-07T16:32:42+5:302022-12-07T16:32:49+5:30

पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर तात्काळ उपाययोजना

Convenient travel for people in rural areas of Pune 23 routes started from PMP | पुण्याच्या ग्रामीण भागातील जनमाणसाचा प्रवास सोयीस्कर; पीएमपी कडून २३ मार्ग सुरू

पुण्याच्या ग्रामीण भागातील जनमाणसाचा प्रवास सोयीस्कर; पीएमपी कडून २३ मार्ग सुरू

googlenewsNext

पुणे : ग्रामीण भागातील पीएमपीला मिळणारे उत्पन्न आणि प्रवासी सेवा पुरवण्यासाठी लागणारा खर्च यामध्ये मोठी तफावत होत असल्याने पीएमपी प्रशासनाने ग्रामीण भागातील २३ मार्ग बंद करण्यात आले होते. तसेच एसटी महामंडळाने देखील पुणे महानगर परिवहन मंडळाला पत्र लिहून आम्हाला या मार्गांवर तोटा होत असून, या मार्गावरील पीएमपी बस सेवा बंद करण्याचे सांगितले होते. यानुसार पीएमपी अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी २६ नोव्हेंबर आणि ३ डिसेंबर रोजी २३ ग्रामीण भागातील मार्ग बंद केले. यानंतर ग्रामीण भागातील नागरिक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याने बंद केलेली पीएमपी सेवा पुन्हा सुरू करा अशी मागणी वाढत होती. त्यातच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील ग्रामीण भागातील पीएमपी सेवा पुन्हा सुरू होणे गरजेचे असल्याचे सांगितले. याची प्रशासानाने दखल घेत ७ डिसेंबर पासून पुन्हा २३ मार्गांवरील सेवा सुरू केली.

पूर्ववत झालेले पीएमपी मार्ग..

१) २३१ - स्वारगेट - काशिंगगाव
२) २३२ - स्वारगेट - बेलावडे
३) २९३ - कात्रज सर्पोद्यान - सासवड
४) २९६ - कात्रज सर्पोद्यान - विंझर
५) २११ - सासवड - उरूळी कांचन
६) २१२ - हडपसर - मोरगाव
७) २१० - हडपसर - जेजुरी
८) २२७ अ बीआरटी - मार्केट यार्ड - खारावडे/लव्हार्डे
९) १३७ बीआरटी - वाघोली - राहुगाव, सालु मालू
१०) ३५३ - चाकण, आंबेठाण चौक - शिक्रापुर फाटा
११) २२० - सासवड - यवत
१२) ७४ - हिंजवडी शिवाजी चौक - घोटावडे फाटा
१३) ८६ - पुणे स्टेशन - पौंड एसटी स्टँड
१४) १०६ - एनडीए गेट नं. १० - सिम्बायोसिस नर्सिंग सुसगाग
१५) १३५ बीआरटी - वाघोली - रांजणगाव सांडस
१६) १५७ - भेकराईनगर - तळेगाव ढमढेरे
१७) १५९ ब बीआरटी - शिक्रापुर एसटी स्टँड - लोणी धामणी
१८) १६४ बीआरटी - शिक्रापुर एसटी स्टँड - न्हावरे
१९) १८४ - हडपसर - लोणी काळभोर रामदरा
२०) २२८ - कात्रज - वडगाव मावळ
२१) २६४ - भोसरी - पाबळगाव
२२) ३१६ - चिंचवडगाव - खांबोली (कातरखडक)
२३) ३६८ - निगडी - लोणावळा रेल्वे स्टेशन

Web Title: Convenient travel for people in rural areas of Pune 23 routes started from PMP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.