पारंपरिक गुन्हे घटले; आर्थिक, सायबर गुन्हे वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 10:12 PM2020-01-07T22:12:17+5:302020-01-07T22:21:29+5:30

अन्य शहरातील रिसप्रॉन्स टाईम पाहता पुणे शहरातील ५ मिनिटे हा रिस्प्रॉन्स टाईम सर्वात चांगला..

Conventional crime decreased; Financially, cyber crime increased | पारंपरिक गुन्हे घटले; आर्थिक, सायबर गुन्हे वाढले

पारंपरिक गुन्हे घटले; आर्थिक, सायबर गुन्हे वाढले

Next
ठळक मुद्देशहरातील व्हाईट कॉलर गुन्हेगारीत वाढ होत असल्याचे चित्रसर्व गुन्ह्यांमध्ये ८७९ ने गुन्हे घटले

पुणे : शहरातील खुनाचा प्रयत्न, शरीराविरुद्धचे गुन्हे, जबरी चोरी, सोनसाखळी चोरी, घरफोड्या, वाहनचोरी यांच्या संख्येत घट होत असतानाच आर्थिक गुन्हे आणि सायबरचोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे़. त्यामुळे शहरातील व्हाईट कॉलर गुन्हेगारीत वाढ होत असल्याचे चित्र २०१९ मध्ये शहरात दाखल झालेल्या गुन्ह्यांमधून दिसून येत आहे. 
पोलीस आयुक्त डॉ़. के़. व्यंकटेशम यांनी २०१९ मध्ये शहरात घडलेल्या गुन्ह्यांचा आढावा घेतला. यावेळी सहआयुक्त डॉ़. रवींद्र शिसवे, अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे, डॉ़. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त बच्चनसिंह, मितेश गिट्टे आदि उपस्थित होते़.
२०१८ च्या तुलनेत फक्त खुनाच्या गुन्ह्यात २ ने वाढ झाली असून सर्व गुन्ह्यांमध्ये ८७९ ने गुन्हे घटले आहेत. महिलांवरील अत्याचारातील विनयभंगाच्या गुन्ह्यात १९ टक्के तर, बलात्काराच्या घटनांमध्ये ६ टक्क्यांनी घट झाली आहे़. सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये ११४ गुन्हे कमी झाले आहेत. वाहनचोरीच्या गुन्ह्यात २९० गुन्ह्यांनी घट झाली आहे़. मालमत्तेचे गुन्हे ६८२ ने कमी झाले आहेत. 


 अन्य शहरातील रिसप्रॉन्स टाईम पाहता पुणे शहरातील ५ मिनिटे हा रिस्प्रॉन्स टाईम सर्वात चांगला असल्याचे सांगून पोलीस सह आयुक्त रवींद्र शिसवे यांनी सांगितले की, पूर्वी २० ते २५ मिनिटे रिस्पॉन्स टाईम होता. तो कमी करण्यासाठी पोलिसांच्या कार्यशाळा घेण्यात आल्या. त्यातील तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्याने पुणे पोलीस सर्वात चांगला रिस्प्रॉन्स टाईम देऊ शकत आहेत. 
पारंपारिक गुन्ह्यांच्या संख्येत घट होत असतानाच सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झालेली दिसून येत आहे़. यंदा स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे स्थापन करण्यात आले आहे़. सायबर पोलीस ठाण्यात २०१९ मध्ये २८० गुन्हे दाखल झाले असून ७१ आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ७ लाख ८८ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे़. सायबर गुन्ह्यांमध्ये चोरीला गेलेल्या रक्कमेपैकी यंदा तब्बल ११ कोटी ३९ लाख ३५ हजार ४५९ रुपये संबंधितांना परत करण्यात आले आहेत. २०१८ मध्ये ४ कोटी १८ लाख ५५हजार रुपये रिफंड करण्यात आले आहेत. 
आर्थिक गुन्हे शाखेकडे सध्या ३५ गुन्हे तपासावर असून या गुन्ह्यांमध्ये १३५० कोटी ७ ७ लाख ५६ हजार रुपयांची मालमत्ता सरंक्षित करण्यात आली आहे़ तर २७ कोटी ४८ लाख ११ हजार ८४२ रुपये जप्त करण्यात आले आहेत. 
़़़़़़़

पोलीस दलाच्या वतीने राबविलेले गुन्हेगारांवर ‘वॉच’ ठेवणारा ‘स्क्रिप’ उपक्रम, गस्त, प्रतिबंधात्मक कारवाई अशा अनेक बाबींमुळे गुन्ह्यांची संख्या कमी झाली़. पुणे अमली पदार्थ मुक्त करण्याचा निर्धार आहे़. प्राणघातक अपघातांची संख्या कमी झाली असली तर ती पोलिसांच्या कारवाईमुळे नाही़ तर त्याला अनेक कारणे आहेत. पुढील वर्षात वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत ठेवण्याकडे अधिक लक्ष देणार आहोत.
डॉ. के़. व्यंकटेशम, पोलीस आयुक्त.

...........

Web Title: Conventional crime decreased; Financially, cyber crime increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.