ख्रिस गेलने साधला विद्यार्थ्यांशी संवाद
By admin | Published: May 1, 2017 02:42 AM2017-05-01T02:42:53+5:302017-05-01T02:42:53+5:30
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ख्रिस गेल यांनी रविवारी रहाटणीतील एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूलला भेट दिली. निमित्त होते
पिंपरी : आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ख्रिस गेल यांनी रविवारी रहाटणीतील एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूलला भेट दिली. निमित्त होते शाळेच्या मैदानाच्या उद्घाटन समारंभाचे... आंतरराष्ट्रीय खेळाडूला भेटण्याची, प्रत्यक्षात पाहण्याची उत्सुकता असल्याने मोठ्या संख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनी शाळेच्या प्रांगणात दाखल झाले होते. सकाळी दहा वाजता गेलचे आगमन झाले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. डी. के. भोसले यांनी पुणेरी पगडी घालून गेल यांचे स्वागत केले.
बालपणातील काही प्रसंग, आठवणी, तसेच आवड-निवड याबद्दल आणि क्रिकेटच्या यशस्वी कारकिर्दीबद्दल विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले. त्या प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली. विद्यार्थ्यांच्या गर्दीसोबत त्यांनी सेल्फीही घेतला. विद्यार्थ्यांना त्यांनी आॅटोग्राफ दिला. विचारलेल्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. एसएनबीपी वर्ल्ड स्कूलच्या नूतन इमारतीचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते झाले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. भोसले, वृषाली भोसले, देवयानी भोसले, ऋतुजा भोसले, संचालक सुनील शेवाळे, क्रीडा संचालक फिरोज शेख, प्राचार्या जयश्री व्यंकटरमन, नीना भल्ला, अंशी पट्टा, विभाकर तलोरे, प्रियंका अग्रहारी, रश्मी शुक्ला, कविता जोशी, रोहिणी जगताप, डॉ. सुधीर अटवाडकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)