तरुणाईशी संवाद हीच माझ्या कार्यामागील ऊर्जा
By admin | Published: June 21, 2017 06:18 AM2017-06-21T06:18:05+5:302017-06-21T06:18:05+5:30
भाई म्हणाले, जगामध्ये जे बदल होतात, अनेक घडामोडी होतात, जागतिकीकरणामुळे जे बदल होतात, त्यांचा अभ्यास करावा लागतो.
भाई म्हणाले, जगामध्ये जे बदल होतात, अनेक घडामोडी होतात, जागतिकीकरणामुळे जे बदल होतात, त्यांचा अभ्यास करावा लागतो. ज्या पद्धतीने अर्थव्यवस्था बदलली त्याचा अभ्यास करावा लागतो. जगामध्ये अनेक गोष्टींमध्ये जे बदल झाले आहेत, त्याचा अभ्यास करावा लागतो.
इंडस्ट्रिअल कॅपिटलइझम आला फायनान्शिअल कॅपिटलइझम आला की तो समजावून घ्यावा लागतो. त्याच्यासाठी वाचावं लागतं. अभ्यास करावा लागतो. मी आजही अभ्यास करतो. नवीन नवीन विषय समजावून घेतो आणि जिथे जिथे मला शक्य आहे, तिथे तरुणांना ते समजावून देतो. तरुणांचे आणि माझे संबंध फार मजबूत आहेत आणि तरुण मला आनंदाने भेटतात, हे माझे मोठे भाग्य आहे. त्यामुळे माझी तब्येत
चांगली राहते.
आज जगभर जागतिकीकरणाचे वर्चस्व आहे. जागतिकीकरण हे वित्तीय भांडवलशाहीचे बाळ आहे. आता पोस्ट इंडस्ट्रिअल वर्ल्ड आहे. पूर्वी कारखानदारी उभी करण्यावर भर होता. आता गुंतवणुकीवर, शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवण्यावर भर आहे. त्याला वित्तीयभांडवलशाही म्हणतात. या वित्तीय भांडवलशाहीला स्वार्थाशिवाय काही दिसत नाही. नफा कसा वाढेल
याशिवाय वित्तीय भांडवलशाहीला काही दिसत नाही. पाश्चात्त्य देशांमध्ये अफाट पैसा होता. तो त्याच देशात गुंतविणे अशक्य होते.
त्यामुळे जगाचे मार्केट करण्यात आले.
या भांडवलशाहीला शेतकरी, कामगार यांच्याशी काही देणेघेणे नाही. देशात गेल्या २५ वर्षांमध्ये साडेतीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. महाराष्ट्रातील १७ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या देशात असे कधी घडले नव्हते. शेतीची जमीन हिसकावून ती योग्य मोबदला न देता भांडवलदारांच्या घशात घालण्यात आली. औद्योगिकीकरण महत्त्वाचे असेल तर शेती बुडाली पाहिजे ही या वित्तीय भांडवलशाहीची भूमिका आहे. त्यामुळे जगात कुठेही न घडलेला साडेतीन लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा दुर्दैवी प्रकार या देशात झाला. कायदा पायदळी तुडवून कंत्राटी कामगार नेमण्याचा धडाका सुरू झाला. या वित्तीय भांडवलशाहीचा जगभर धुमाकूळ सुरू झाला.
जगभर विषमता, बेरोजगारी आणि प्रदूषण या कळीच्या समस्या बनल्या. जागतिकीकरणामुळे काही चांगल्या, काही वाईट प्रतिक्रिया उमटल्या. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाले. अन्यायाविरुद्ध आवाज उठविणारे, समाजवादी मांडणी करणारे बर्नी सँडस, शमा सावंत यांच्यासारखे प्रतिनिधी निवडून आले. त्यामुळे विषमतेविरुद्धची लढाई लढायची असेल तर समाजवादाला पर्याय नाही. ते म्हणाले, काँग्रेसची धूळधाण झाली. केवळ ४४ खासदार निवडून आले. विरोधी पक्षाचाही दर्जा मिळू शकलेला नाही. नरेंद्र मोदी स्वत:च्या बळावर आले नाहीत, तर काँग्रेसचा जो दुर्व्यवहार होता, त्याची ती
प्रतिक्रिया होती.
काँग्रेसने जागतिकीकरणाचे धोरण अंमलात आणले, मनमोहनसिंग यांनी १९९१ चे अंदाजपत्रक आणून त्याला सुरुवात केली, त्याच्यामुळे या साऱ्या गोष्टी घडत आहेत. काँग्रेसने आता आर्थिक धोरणांचा फेरविचार करायची, मनमोहनसिंग यांचे आर्थिक धोरण बाजूला सारण्याची गरज आहे. अन्यथा हा मोठी परंपरा असलेला पक्ष नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही.