Pune Porsche Car Accident: अल्पवयीन मुलाला वयाची खातरजमा न करता मद्य पुरवल्याचे निष्पन्न; पबमालकांच्या जामीन अर्जाला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 09:18 AM2024-06-11T09:18:01+5:302024-06-11T09:18:28+5:30

Pune Porsche Car Accidentदोन्ही पबमध्ये अल्पवयीन मुलांना मद्यविक्रीस मनाई असल्याचा फलकही लावला नसल्याचे पोलिसांच्या पंचनाम्यात उघड

Conviction of supplying alcohol to a minor without proof of age; Opposition to pub owners' bail application | Pune Porsche Car Accident: अल्पवयीन मुलाला वयाची खातरजमा न करता मद्य पुरवल्याचे निष्पन्न; पबमालकांच्या जामीन अर्जाला विरोध

Pune Porsche Car Accident: अल्पवयीन मुलाला वयाची खातरजमा न करता मद्य पुरवल्याचे निष्पन्न; पबमालकांच्या जामीन अर्जाला विरोध

Pune Porsche Car Accident : कल्याणीनगर येथील पाेर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपी अल्पवयीन मुलासह मित्रांचे पार्टीसाठी बुकिंग घेत पबचालकांनी त्यांच्या वयाची खातरजमा न करता मद्य पुरविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींना जामीन झाल्यास पुराव्यात छेडछाड करून तपासात अडथळा आणण्याची शक्यता आहे, असा युक्तिवाद करत सरकार पक्षाने सोमवारी (दि. १०) विशाल अग्रवाल याच्यासह पबमालक व कर्मचाऱ्यांच्या जामीन अर्जाला विरोध केला. जामिनावर विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून, त्यावर २१ जून रोजी निर्णय होण्याची शक्यता आहे.

कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाला कार चालविण्यास दिल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल (वय ५०, रा. ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी) आणि अल्पवयीन मुलाला व त्याच्या मित्रांना मद्य पुरविल्याप्रकरणी ‘कोझी’ पबच्या मालकाचा मुलगा नमन प्रल्हाद भुतडा (वय २५, रा. ए ७, पद्मविलास एन्क्लेव्ह, वानवडी), व्यवस्थापक सचिन अशोक काटकर (वय ३५, रा. साईसदन ए २, तुकाईदर्शन, हडपसर) आणि ‘ब्लॅक’ पबचा सहायक व्यवस्थापक संदीप रमेश सांगळे (वय ३५, रा. ऑस्कर शाळेसमोर, फ्लॅट नं. १०७, पद्मावती हाइट्स, मुंढवा), बार काऊंटरचा व्यवस्थापक जयेश सतीश गावकर (वय २३, रा. केशवनगर) आणि कर्मचारी नितेश धनेश शेवानी (वय ३४, रा. एनआयबीएम) यांनी जामिनावर मुक्त करण्यासाठी अर्ज केला आहे.
बचाव पक्षातर्फे ॲड. एस. के. जैन, ॲड. सुधीर शहा, ॲड. अमोल डांगे आणि ॲड. प्रशांत पाटील यांनी युक्तिवाद केला. या गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला असून, आरोपींनी तपासात पूर्णपणे सहकार्य केले आहे. आरोपींवरील कलमे अदखलपात्र असून, त्यांना जामीन देण्यात यावा, असा बचाव आरोपींच्या वकिलांनी केला. त्याला विशेष सरकारी वकील विद्या विभुते व तपास अधिकारी गणेश माने यांनी विरोध केला.

गुन्हा घडल्यावर विशाल अग्रवाल फरार झाला होता, त्याने घरातील सीसीटीव्ही चित्रीकरणात छेडछाड केली आहे, तसेच मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केला असून, गुन्हा अंगावर घेण्यासाठी चालकावर दबाव आणला आहे, तर अपघाताच्या घटनेपूर्वी आरोपी पबचालकांनी अल्पवयीन मुलाला व त्याच्या मित्रांना मद्य पुरविल्याचे तपासात निदर्शनात आले असून, या दोन्ही पबमध्ये अल्पवयीन मुलांना मद्यविक्रीस मनाई असल्याचा फलकही लावला नसल्याचे पोलिसांच्या पंचनाम्यात उघड झाले आहे. त्यामुळे आरोपींचा जामीन अर्ज फेटाळावा, असा युक्तिवाद सरकार पक्षाने केला.

Web Title: Conviction of supplying alcohol to a minor without proof of age; Opposition to pub owners' bail application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.