कोरोनाविरुद्धच्या लढ्यात प्रशासनाला सहकार्य करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:06 AM2021-05-03T04:06:15+5:302021-05-03T04:06:15+5:30

लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे पुणे जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने व शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील ...

Cooperate with the administration in the fight against Corona | कोरोनाविरुद्धच्या लढ्यात प्रशासनाला सहकार्य करा

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात प्रशासनाला सहकार्य करा

Next

लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे पुणे जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने व शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून ३० बेड्चे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी तहसीलदार रमा जोशी, शिवसेना सहसंपर्कप्रमुख सुरेश भोर, तालुकाप्रमुख अरुण गिरे, जिल्हा परिषद गटनेते देविदास दरेकर, पायोनियर हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक डॉ. ताराचंद कराळे,पंचायत समिती सदस्य प्रा. राजाराम बाणखेले, रवींद्र करंजखेले, भाजपा संपर्कप्रमुख जयसिंग एरंडे, लांडेवाडीचे सरपंच अंकुश लांडे, उपसरपंच दत्ता तळपे, भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक सागर काजळे आदी उपस्थित होते.

आढळराव पाटील म्हणाले की, ग्रामीण भागात सध्या रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने लांडेवाडी येथे कोविड सेंटर करावे यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह प्रांताधिकारी, तहसीलदार व तालुका प्रशासनाशी संपर्क साधून पाठपुरावा केला होता. प्रशासनाकडे असलेली डॉक्टरांची अपुरी संख्या लक्षात घेऊन पायोनियर हॉस्पिटलचे डॉ. ताराचंद कराळे यांच्या माध्यमातून तीन डॉक्टर व चार वॉर्डबॉय उपलब्ध केले आहेत. यासह भैरवनाथ पतसंस्था व भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने टेबल-खुर्च्या, पंखे, टीव्ही, लाईट साहित्य, भोजन व्यवस्था आदी कामे मार्गी लावली आहेत. ग्रामपंचायत लांडेवाडी यांनीदेखील आवश्यक साहित्य कोविड सेंटरसाठी उपलब्ध करून दिले आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन एकदिलाने कोरोनाचा सामना केल्यास हा लढा आपण लवकरच यशस्वीपणे जिंकू असा आत्मविश्वास या वेळी आढळराव पाटील यांनी व्यक्त केला.

लांडेवाडी येथे ३० बेड्चे रुग्णालय कार्यान्वित करण्यात आले असून, येथे वैद्यकीय सेवा व रुग्णांना आवश्यक सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी या वेळी दिली.

Web Title: Cooperate with the administration in the fight against Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.