पोलिसांना सहकार्य करा
By Admin | Published: May 23, 2017 05:05 AM2017-05-23T05:05:53+5:302017-05-23T05:05:53+5:30
रमजानच्या पवित्र महिन्यात कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
येरवडा : रमजानच्या पवित्र महिन्यात कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही
यासाठी सर्वांनिच जाग्.ारूक राहण्याची गरज आहे. कोणत्याही परिस्थितीत चुकीची प्रतिक्रिया न देता पोलिसांशी कायमच संपर्क ठेवून रमजान सण उत्साहात आणि शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त दीपक साकोरे यांनी व्यक्त केले.
येरवड्यात घेण्यात आलेल्या खडकी विभागातील मशिदींच्या पदाधिकाऱ्यांच्या स्नेहमेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी सहायक पोलीस आयुक्त वसंत तांबे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब सुर्वे, कमलाकर ताकवले, राजेंद्र मुळीक, अशोक कदम उपस्थित होते. या कार्यक्रमात मशिद समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या विविध शंकांचे पोलिसांकडून निरसन करण्यात
आले. डेक्कन कॉलेज दर्गा समितीच्या वतीने उपायुक्त साकोरे यांचा सत्कार केला गेला.
आपल्या व समाजातील सुरक्षिततेबाबत सर्वांनीच जागरूक राहून पोलीस दलाला सहकार्य करावे. नागरिकांनी नियंत्रण कक्षाच्या १०० या संपर्क क्रमांकाबरोबरच स्थानिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक माहीत करून घ्यावेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.