सहकार क्षेत्रातील दिग्गज अशोक काशिनाथ काळभोर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2020 03:42 PM2020-10-04T15:42:29+5:302020-10-04T15:51:38+5:30

Ashok kalbhor : लोणी काळभोर ग्रामपंचायतीचे सदस्य व लोणी काळभोर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.

cooperative sector ashok kalbhor passes away in pune | सहकार क्षेत्रातील दिग्गज अशोक काशिनाथ काळभोर यांचे निधन

सहकार क्षेत्रातील दिग्गज अशोक काशिनाथ काळभोर यांचे निधन

लोणी काळभोर - पुणे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील दिग्गज व्यक्तीमत्व अशोक काशिनाथ काळभोर ( वय ६९ ) यांचे अकस्मात निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. 

१९९२\९३ मध्ये त्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे तर १९८९ मध्ये १ वर्ष व २००६ नंतर सलग ५ वर्षे त्यांनी थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून प्रभावी कामगिरी केली होती. तसेच १९९५ ते १९९९ या कालावधीत त्यांनी गुलटेकडी येथील हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून त्यांनी अतिशय चांगले काम केले होते. तसेच शरद हवेली खरेदी विक्री संघाचे ते संस्थापक होते. यासमवेत शेतकरी हितासाठी हवेली तालुक्यात विविध सहकारी संस्थांची उभारणी त्यांनी केली होती.

तालुक्यातील सहकार क्षेत्रात त्यांचा दबदबा होता. लोणी काळभोर ग्रामपंचायतीचे सदस्य व लोणी काळभोर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. सन २००४ सालच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार म्हणून त्यांनी पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात निवडणुक लढवली होती. जेष्ठ नेते शरद पवार व अजित पवार यांचे ते अतिशय जवळचे सहकारी होते. 

Web Title: cooperative sector ashok kalbhor passes away in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे