बारामतीच्या एकात्मिक विकास समन्वय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:08 AM2021-06-20T04:08:19+5:302021-06-20T04:08:19+5:30
सांगवी : बारामती तालुका एकात्मिक विकास समन्वयक व पुनर्विलोकन समितीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांची निवड करण्यात ...
सांगवी : बारामती तालुका एकात्मिक विकास समन्वयक व पुनर्विलोकन समितीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांची निवड करण्यात आली. तालुका स्तरावरील ही उच्च समिती मानली जाते.
यासाठी विविध राजकीय पदाधिकारी, शैक्षणिक व शासकीय अधिकारी यांची निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ही निवड केली आहे. तर, बाळासाहेब परकाळे, सुशांत जगताप, मंगेश खताळ, रमेश इंगुले, निखिल देवकाते, वनिता बनकर, अनिता गायकवाड यांच्या सदस्यपदी नेमणुका करण्यात आल्या आहेत. तहसीलदार हे या समितीचे सचिव म्हणून कामकाज पहाणार आहेत.
या समितीच्या अध्यक्षपदी तालुक्याचे आमदार काम पाहत असतात, परंतु बारामती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांचा गेल्या ३० वर्षांचा विविध सामाजिक कामाचा अनुभव पाहता त्यांच्याकडे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी ही जबाबदारी सोपावली आहे. होळकर यांनी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना, संजय गांधी निराधार योजना, जिल्हा परिषद बांधकाम सभापती ते बारामती तालुकाध्यक्षपर्यंत विविध पदे भूषवूण तळागाळातील लोकांसाठी कामकाज पाहिले आहे. या समितीमार्फत ग्रामीण क्षेत्राचा सर्वांगीण आणि व्यापक विकास घडवून या हेतूने आणि विशेषत: समाजातील अविकसित कामावर अधिक भर देण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने सामाजिक आर्थिक विकासावर ही समिती कामकाज करत असते.
—————————————————————
फोटो ओळी : संभाजी होळकर
१९०६२०२१-बारामती-०६
————————————————
रविवारच्या अंकात बातमी फोटोसह घ्यावी