HSC Result: कॉपी करणे, परीक्षकांना धमकी, उत्तरपत्रिका फाडणे; बारावी परीक्षेत १०६१ गैरप्रकार

By प्रशांत बिडवे | Published: May 25, 2023 04:57 PM2023-05-25T16:57:19+5:302023-05-25T16:58:20+5:30

विद्यार्थ्यांनी काॅपी केल्याचे सर्वाधिक प्रकरणे छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळाच्या परीक्षा केंद्रांवर घडली

copying threatening examiners tearing answer sheets 1061 malpractice in 12th exam | HSC Result: कॉपी करणे, परीक्षकांना धमकी, उत्तरपत्रिका फाडणे; बारावी परीक्षेत १०६१ गैरप्रकार

HSC Result: कॉपी करणे, परीक्षकांना धमकी, उत्तरपत्रिका फाडणे; बारावी परीक्षेत १०६१ गैरप्रकार

googlenewsNext

पुणे : बारावी परीक्षेदरम्यान राज्यातील नउ विभागीय मंडळांमध्ये विद्यार्थ्यांनी काॅपी केल्याप्रकरणी ३४५ घटनांची नाेंद झाली आहे. यासह परीक्षेदरम्यान आणि परीक्षेनंतर एकुण १ हजार ६१ गैरप्रकार घडले आहेत. परीक्षेत गैरप्रकार केल्याप्रकरणी राज्यभरात विविध पाेलीस ठाण्यात ११ गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती शरद गाेसावी यांनी दिली.

परीक्षेत काॅपी करणे, ताेतयेगिरी करीत डमी विद्यार्थी परीक्षेस बसविणे, वर्गातील परीक्षकांना धमकी देणे, उत्तरपत्रिका फाडणे, ओळख पटावी यासाठी उत्तरपत्रिकेत स्वत:चे तसेच देवाचे नाव लिहिणे , नाेटा लावणे अथवा विशिष्ट खून करणे तर काही प्रकरणात शिक्षकांकडून सहाय्य केले जाणे आदी स्वरूपाचे गैरप्रकार घडत असतात. काॅपी केल्याप्रकरणी ३४५, गैरप्रकार केल्याप्रकरणी ७१५ आणि पुणे विभागीय मंडळाच्या परीक्षा केंद्रावर बारावी परीक्षेदरम्यान विद्यार्थ्याच्या जागी डमी उमेदवार उत्तरपत्रिका लिहित असल्याची एक घटना असे यावर्षी राज्यात एकुण १ हजार ६१ गैरप्रकार घडले आहेत.

विद्यार्थ्यांनी काॅपी केल्याचे सर्वाधिक १११ प्रकरणे छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळाच्या परीक्षा केंद्रांवर घडले आहेत. त्यानंतर पुणे ८८, नागपूर ५२, लातूर ३८, अमरावती २०, मुंबई १९, नाशिक १३, काेल्हापूर ३ आणि काेकण विभागात १ काॅपी प्रकरणाची नाेंद झाली आहे. इतर स्वरूपाच्या गैरप्रकारात छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळ अग्रेसर असून ५१० , नाशिक ५९, अमरावती ४२, पुणे ३६, मुंबई २४, लातूर २०, काेल्हापूर १७, नागपूर ७ तर काेकण मंडळात एकही गैरप्रकार घडला नाही.

Web Title: copying threatening examiners tearing answer sheets 1061 malpractice in 12th exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.