कोथिंबीरीने खाल्ला भाव! शेकडा उच्चांकी ४ हजार मिळाला दर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 12:38 PM2021-10-19T12:38:58+5:302021-10-19T12:41:02+5:30
बारामती : इंदापूर बाजार समितीमधील भाजीपाला लिलाव बाजारात कोथिंबीरीने चांगलाच भाव खाल्ला आहे. सध्या बाजारात टोमॅटो, वांगे, कोथिंबीर आदीचे ...
बारामती: इंदापूर बाजार समितीमधील भाजीपाला लिलाव बाजारात कोथिंबीरीने चांगलाच भाव खाल्ला आहे. सध्या बाजारात टोमॅटो, वांगे, कोथिंबीर आदीचे दर तेजीत आहेत. कोथिंबीरीला शेकडा उच्चांकी ४ हजार दर मिळाला आहे. तर मागील काही दिवसांमध्ये हिरव्या मिरचीच्या दरात वाढ झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमधून देखील समाधान व्यक्त होत आहे.
अधिक माहिती देताना सभापती दत्तात्रय फडतरे म्हणाले, दोन महिन्यांपूर्वी ऑगस्टमध्ये इंदापूर बाजार समितीमध्ये प्रथमच भाजीपाला लिलाव बाजार सुरू करण्यात आले होते. माजी सभापती अप्पासाहेब जगदाळे, आमदार तथा उपसभापती यशवंत माने यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यामध्ये प्रथमच सायंकाळी भाजीपाला लिलाव घेणारी इंदापूर बाजार समिती पहिलीच बाजार समिती ठरली होती. दिवसभराच्या तोड्यानंतर शेतातून थेट बाजारात येणारा ताजा तरकारी माल यामुळे बाजारात तरकारी मालाला चांगला उठाव मिळत आहेत. परिणामी शेतकऱ्यांना जादा दराचा फायदा देखील होत आहे. निवडक माल, खात्रीशीर वजनमाप आणि उच्चांकी बाजारभाव यामुळे इंदापूरसह आजूबाजूच्या तालुक्यातून देखील भाजीपाला इंदापूर बाजार समितीमध्ये येऊ लागला आहे.
बाजारभाव
प्रकार बाजारभाव (प्रति १० किलो)
टोमॅटो- २०० ते ८००
कारले पांढरे- २०० ते २५०
कारले हिरवे- २५० ते ३००
घेवडा - ३०० ते ४५०
भेंडी- १८० ते २२०
काकडी - १८० ते २२०
फ्लॉवर- ३०० ते ३५०
कोबी- १०० ते १५०
मिरची हिरवी- १५० ते २००
गवार गावरान- ५०० ते ६००
गवार पुणेरी - ३५० ते ४५०
शेवगा - ५०० ते ६००
ढोबळी - २०० ते ४००
मेथी (शेकडा) - १००० ते १२००
पालक शेकडा - ५०० ते ८००
कोथींबीर शेकडा - १००० ते ४०००