कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खोरची यात्रा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:08 AM2021-03-30T04:08:48+5:302021-03-30T04:08:48+5:30

सध्या कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आज दौंड तालुक्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे गेल्या वर्षी देखील ...

Corner trip canceled in the background of the corona | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खोरची यात्रा रद्द

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खोरची यात्रा रद्द

Next

सध्या कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आज दौंड तालुक्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे गेल्या वर्षी देखील खोर यात्रा रद्द करण्यात आली होती. आणि यावर्षी देखील तोच निर्णय घेण्यात आला आहे. फक्त देवांचे कार्यक्रम सध्या पध्दतीने होणार असून यामध्ये रविवार दि. ४ रोजी श्री काळभैरवनाथ अष्टमी, पीरसाहेब संदल अगदी मोजक्या ग्रामस्थांच्या मध्ये पार पडणार आहे. सोमवार दि.५ रोजी व मंगळवार दि.६ रोजी कुठल्याही प्रकारचे कार्यक्रम होणार नसून शासकीय नियमांचे पालन करून कुठल्याही प्रकारचे उल्लंघन न करता या वर्षीची खोर यात्रा रद्द करण्यात आली आहे.

या प्रसंगी खोर ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

खोर येथील ग्रामदैवत असेलेले श्री काळभैरवनाथ, तुकाईमाता व राजबक्सार पीरसाहेब यांचा यात्रा उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती खोर यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे.

Web Title: Corner trip canceled in the background of the corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.