कोरोनाबाधितांची वाढ कायम - शुक्रवारी ७२७ नवे कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:13 AM2021-02-27T04:13:43+5:302021-02-27T04:13:43+5:30

पुणे : शहरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ शुक्रवारीही कायम असून, आज दिवसभरात ७२७ नवे कोरोनाबाधित आढळले. विशेष म्हणजे गेल्या ...

Corona-affected growth continues - Friday 727 new corona-affected | कोरोनाबाधितांची वाढ कायम - शुक्रवारी ७२७ नवे कोरोनाबाधित

कोरोनाबाधितांची वाढ कायम - शुक्रवारी ७२७ नवे कोरोनाबाधित

Next

पुणे : शहरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ शुक्रवारीही कायम असून, आज दिवसभरात ७२७ नवे कोरोनाबाधित आढळले. विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांमध्ये प्रथम संशयितांच्या तपासणीचा आकडा सात हजाराच्या पुढे गेला असून, आज विविध प्रयोगशाळांमध्ये ७ हजार १०८ तपासण्या करण्यात आल्या. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी १०़ २२ टक्के आहे़

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी सहा वाजेपर्यंत शहरातील विविध रूग्णालयांत आॅक्सिजनसह उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या ४४९ इतकी असून, शहरातील गंभीर रूग्णसंख्या ही २४५ इतकी आहे़ तर आज दिवसभरात ३९८ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले असून, शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही पुन्हा चार हजाराच्या वर गेली असून, आजमितीला शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही ४ हजार २५३ इतकी झाली आहे़

शहरात आजपर्यंत ११ लाख २८ हजार ३३२ हजार जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी २ लाख १ हजार १८९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ९२ हजार ८९ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात ८ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी २ जण पुण्याबाहेरील आहेत़ आजपर्यंत शहरात कोरोनामुळे ४ हजार ८४७ जणांचा मृत्यू झाला आहे़

--------------------------

Web Title: Corona-affected growth continues - Friday 727 new corona-affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.