कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीत दीड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:12 AM2021-08-29T04:12:31+5:302021-08-29T04:12:31+5:30

बारामती येथे मॅग्नेट प्रकल्पांतर्गत राज्यातील पहिल्या प्रकल्पाचे भूमिपूजन बारामती: राज्याच्या तिजोरीमध्ये दर वर्षी साडेचार लाख कोटी रुपये जमा होत ...

Corona and a half in the state coffers | कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीत दीड

कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीत दीड

Next

बारामती येथे मॅग्नेट प्रकल्पांतर्गत

राज्यातील पहिल्या प्रकल्पाचे भूमिपूजन

बारामती: राज्याच्या तिजोरीमध्ये दर वर्षी साडेचार लाख कोटी रुपये जमा होत असतात. मागील दीड वर्षापासून असलेल्या कोरोना संकटामुळे राज्याच्या तिजोरीत दीड लाख कोटींची तूट आली आहे. परिणामी, विकासकामांसाठी निधीची मोठ्याप्रमाणात कमतरता जाणवू लागली आहे. मात्र, तरीही महाविकास आघाडी सरकार वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी योजना राबवून निधी देत आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे दिली.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या मॅग्नेट प्रकल्पांतर्गत राज्यातील पहिल्या भाजीपाला हाताळणी सुविधा केंद्राचे भूमिपूजन शनिवारी (दि. २८) बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जळोची उपबाजारामध्ये पार पडले. या वेळी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. या वेळी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील उपस्थित होते. पवार पुढे म्हणाले की, ज्येष्ठ नेते शरद पवार मुख्यमंत्री असताना राज्यामध्ये फलोत्पादन योजना राबविण्यात आली. केंद्रीय कृषी मंत्रिपदाच्या कार्यकाळात हीच योजना पवारसाहेबांनी राष्ट्रीय पातळीवर नेली. त्याचा परिणाम म्हणजे राज्यासह देशात फळांच्या उत्पादनात वाढ झाली. बारमाही फळे उपलब्ध झाली. मात्र कृषिमूल्य साखळीच्या टप्प्यात ४० टक्के, तर शेतकरी ते ग्राहक या प्रक्रियेमध्ये अजूनही फळे, भाजीपाला यांचे ६० टक्क्यांपर्यंत नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी राज्यभरात मॅग्नेट प्रकल्पाव्दारे महाराष्ट्रामध्ये सुमारे १ हजार १०० कोटींची कृषी क्षेत्रासाठी पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत हा पहिला प्रकल्प बारामतीमध्ये उभारण्यात आला आहे.

तत्पूर्वी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील बोलताना म्हणाले की, देशातील फळे निर्यातीमध्ये राज्यातील शेतकऱ्यांचा वाटा मोठा आहे. डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी, सीताफळ, पेरू, चिकू, स्ट्रॉबेरी, भेंडी, मिरची (हिरवी व लाल) व फुलपिके आदींना जागतिक बाजारपेठेमध्ये चांगली मागणी असते. काढणीपश्चात शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी व जागतिक बाजारपेठेतील चांगल्या दराचा फायदा येथील शेतकऱ्यांना व्हावा या उद्देशाने हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. या वेळी सहकार व पणन प्रधान सचिव अनुप कुमार, कार्यकारी संचालक सुनील पवार, सरव्यवस्थापक व मॅग्नेटचे प्रकल्प संचालक दीपक शिंदे, सभापती समिती वसंत गावडे, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, संभाजी होळकर, माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांच्यासह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

------------------------

बाजार समितीच्या माध्यमातून पेट्रोल पंप, सीएनजी सेंटर उभे करण्यात येत आहे. जेणेकरून बाजार समितीच्या उत्पन्नामध्ये वाढ व्हावी हा उद्देश आहे. तसेच सुपे येथे देखील नव्याने बाजार समितीच्या अंतर्गत पेट्रोेलपंप उभारण्यात येत आहे. तर जळोची येथील जनावरे बाजार पुढील काळात तालुक्यातील झारगडवाडी येथे हलविण्यात येणार आहे. त्यासाठी २५ एकर जागा घेण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

---------------------------

यापुढे राज्यसरकार डिझेलवर चालणाऱ्या एसटी बस घेणार नाही. सध्या इंधनटंचाईचे मोठे संकट एसटीवर आहे. त्यासाठी सीएनजी चालणाऱ्या व त्यानंतर इलेक्ट्रिक बस राज्यसरकार टप्प्याटप्प्याने घेणार आहे. एसटी महामंडळाकडे कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी पैैसे नव्हते. काही दिवसांपूर्वी एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी ५०० कोटी रुपये दिले आहेत, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

--------------------------फोटो ओळी : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पणन मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार.

२८०८२०२१-बारामती-०३

——————————————

Web Title: Corona and a half in the state coffers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.