बारामतीत कोरोना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:10 AM2021-01-17T04:10:38+5:302021-01-17T04:10:38+5:30
पहिल्या दिवशी २०० आरोग्य कर्मचाºयांना लसीकरण बारामती :अखेर बहुप्रतीक्षित कोरोना लसीकरणाला बारामतीमध्ये प्रारंभ करण्यात आला. लसीकरणाच्या माध्यामातून मागील ...
पहिल्या दिवशी २००
आरोग्य कर्मचाºयांना लसीकरण
बारामती :अखेर बहुप्रतीक्षित कोरोना लसीकरणाला बारामतीमध्ये प्रारंभ करण्यात आला. लसीकरणाच्या माध्यामातून मागील दहा महिन्यांपासून सुरू असलेल्या कोरोना महामारीसोबत निर्णायक युद्धाला आता सुरूवात झाली आहे. बारामती महिला रुग्णालय येथे लसीकरण मोहिमेचा पहिला लाभार्थी म्हणून अभिजित पवार यांना लस देऊन सुरुवात करण्यात आली. लसीकरणानंतर एकाही लाभार्थ्याला कोणाताही त्रास झाला नसल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
बारामती तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र सांगवी येथे, तर शहरमध्ये महिला शासकीय रुग्णालयात पहिल्या टप्प्यातील लसीकरणास शनिवारी (दि. १६) सुरुवात करण्यात आली. बारामतीमध्ये सकाळी ११ वाजता कोविड लसीकरण सुरू करण्यात आले. यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये शासकीय व खासगी आरोग्य सेवेतील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी एका सत्रामध्ये १०० याप्रमाणे आज एकूण २०० लोकांना लस देण्यात आली. तसेच लाभार्थ्यांची निवड ही जिल्ह्यातून रॅन्डम पद्धतीने होणार आहे त्याचप्रमाणे ज्या लाभार्थ्यांना एसएमएस आलेला आहे अशाच लाभार्थ्यांना लस दिली जाणार आहे. बारामतीसाठी सिरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड लसीचे शनिवारी (दि. १६) २६० डोस मिळाले आहेत. तर उर्वरित सर्व डोस रविवार (दि. १७)पर्यंत मिळतील. आता पहिला डोस दिल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस देण्यात येणार आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.
तालुक्यातील १ हजार २७८ शासकीय आरोग्य कर्मचारी व खासगी वैद्यकीय क्षेत्रातील २ हजार २०० आरोग्य कर्मचाऱ््यांनी कोविन अॅपवर लसीकरणासाठी नोंदणी केली होती. या सर्व कर्मचा-यांना पहिल्या टप्प्यात लसीकरणा करण्यात येणार आहे. सांगवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य कर्मचा-यांना गुलाबपुष्प देऊन लसीकरणास प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, उपमुख्यमंत्र्यांचे कक्ष अधिकारी हनुमंत पाटील, मुख्याधिकारी किरणराज यादव, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, तहसीलदार विजय पाटील, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय तिडके, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. बापू भोई, वैद्यकीय अधिकारी डॉ. केदारे, वैद्यकीय अधिकारी शासकीय महाविद्यालय, डॉ. जाधवर, प्रशासकीय अधिकारी शासकीय महाविद्यालय नंदकुमार कोकरे, डॉ. यशवंत कुलकर्णी, डॉ.जर्नादन सुरटे, डॉ.मेघा, डॉ.दडस तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
या वेळी डॉ. सदानंद काळे यांनी लस देण्याबाबतच्या कार्यपद्धतीची माहिती देताना सांगितले की, केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच लस तीन टप्प्यात देण्यात येणार आहे. कोविन पोर्टलवर नोंदणी झालेल्या आरोग्य कर्मचा-यांना प्रथम लस देण्यात येईल. दुस-या टप्प्यात पोलीस विभागातील कर्मचारी, तिस-या टप्प्यात कोमोबीर्ड रुग्ण व ६० वर्षांवरील व्यक्तीस देण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. या वेळी डॉ. मनोज खोमणे म्हणाले की, पहिल्या सत्रात शंभर लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरण मोहीम जरी सुरू झाली असली, तरी नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहे.
सांगवी (ता. बारामती) येथे कोरोना लसीकरणास सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित अधिकारीवर्ग व आरोग्य कर्मचारी.
१६०१२०२१-बारामती-०१
फोटो ओळी : शासकीय महिला रुग्णालय बारामती येथे लाभार्थी आरोग्य कर्मचाºयास लस देताना व्हॅक्सीनेटर
१६०१२०२१-बारामती-०२
-------------------------------