कोरोना ठरला ‘साठी’च्या पुढील ज्येष्ठांसाठी धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:21 AM2021-02-18T04:21:07+5:302021-02-18T04:21:07+5:30

पुणे : कोरोनाच्या उद्रेकामध्ये प्राण गमवाव्या लागलेल्या नागरिकांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे ‘साठी’च्या पुढील असून, यामध्ये सर्वाधिक कमी संख्या ...

Corona became dangerous for the next seniors of ‘for’ | कोरोना ठरला ‘साठी’च्या पुढील ज्येष्ठांसाठी धोकादायक

कोरोना ठरला ‘साठी’च्या पुढील ज्येष्ठांसाठी धोकादायक

Next

पुणे : कोरोनाच्या उद्रेकामध्ये प्राण गमवाव्या लागलेल्या नागरिकांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे ‘साठी’च्या पुढील असून, यामध्ये सर्वाधिक कमी संख्या ही शून्य ते २० वर्षे या वयोगटातील आहे. गेल्या ११ महिन्यांत शहरातील एकूण ४ हजार ७६४ नागरिकांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत.

शहरात कोरोनाचा राज्यातील पहिला रुग्ण आढळून आला होता. ९ मार्च रोजी निष्पन्न झालेल्या या रुग्णाच्या घरामधील तीनजण बाधित झाले होते. त्यानंतर काही काळातच रुग्ण संख्या वाढू लागली. शहरात कोरोनाचा पहिला बळी ३० मार्च २०२० रोजी गेला. शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ५२ वर्षीय रुग्णाचा शहरातील कोरोनामुळे झालेला हा पहिला मृत्यू झाला. त्यानंतर जसजशी रुग्ण संख्या वाढत गेली, तसतशी मृत्यूंची संख्याही वाढत होती. सुरुवातीला दिवसाकाठी एक-दोन मृत्यूंची नोंद होती. मात्र, सप्टेंबरमध्ये ही संख्या ४० च्या घरात जाऊन पोहोचली होती. वाढलेला मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले.

पालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत ४ हजार ७६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शून्य ते २० वर्षे, २० ते ४० वर्षे, ६० व त्यापुढील वयोगटातील व्यक्तींच्या मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये कोरोनाव्यतिरिक्त अन्य आजार असलेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. मधुमेह, हृदयविकार, दमा, मूत्रपिंड आदी गंभीर स्वरुपाचे आजार असलेल्या रुग्णांचे प्रमाण लक्षणीय आहे. कोरोनाव्यतिरिक्त अन्य आजार असलेल्या ३ हजार ६८६ रुग्णांचा मृत्यू आतापर्यंत नोंदविण्यात आला आहे. गेल्या काही दिवसात मृत्यूदर कमी झाल्याचे सकारात्मक चित्र दिसत आहे. रुग्णसंख्या वाढत असली, तरी मृत्यूदर मात्र स्थिर आहे. त्यामुळे रुग्णवाढीच्या चिंताजनक वातावरणात ही दिलासा देणारी बाब आहे.

=====

कोरोना मृत्यूंची आकडेवारी

वयोगट पुरुष स्त्री एकूण अन्य आजार असलेले रुग्ण

० ते २० ०८ ०८ १६ १४

२० ते ४० १४९ ६३ २१२ १८६

४० ते ६० ८६१ ४६१ १३२२ १०६०

६० ते पुढील २१७७ १०३६ ३२१३ २४२६

एकूण ३१९५ १५६८ ४७६४ ३६८६

Web Title: Corona became dangerous for the next seniors of ‘for’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.