कोरोनामुळे कलादालनांचे ‘बुकिंग’ रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:11 AM2021-03-31T04:11:02+5:302021-03-31T04:11:02+5:30
पुणे : यंदाही रसिकांना प्रदर्शनापासून वंचित राहावे लागणार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चित्रकार, छायाचित्रकार, शिल्पकारांनी आपली नियोजित प्रदर्शने रद्द ...
पुणे : यंदाही रसिकांना प्रदर्शनापासून वंचित राहावे लागणार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चित्रकार, छायाचित्रकार, शिल्पकारांनी आपली नियोजित प्रदर्शने रद्द केली आहेत, तर काहींनी प्रदर्शने पुढे ढकलली आहेत. महापालिकेच्या कलादालनांमध्ये छायाचित्रकार आणि चित्रकारांनी एप्रिल आणि मे महिन्यात प्रदर्शन भरविण्यासाठी केलेले अर्ज मागे घेतले आहेत. खासगी कलादालनेही गेल्या वर्षभरापासून बंद असून, येथेही झालेले ‘बुकिंग’ रद्द करण्यात आले आहे.
अनलॉकनंतर पालिकेच्या कलादालनांमध्ये अनेक प्रदर्शने झाली. पण, कोरोनाच्या वाढत्या संसगार्मुळे प्रदर्शने रद्द केली आहेत. बालगंधर्व रंगमंदिराचे व्यवस्थापक सुनील मते म्हणाले, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ज्यांनी पालिकेच्या कलादालनांमध्ये तारखांचे बुकिंग केले होते त्यांनी प्रदर्शने रद्द केली आहेत. तर काहींनी प्रदर्शने पुढे ढकलली आहेत. एप्रिल आणि मेमधली प्रदर्शने रद्द केली आहेत.
दर्पण आर्ट गॅलरीचे व्यवस्थापक गिरीश इनामदार म्हणाले की, गेल्या वर्षभरापासून कलादालन बंद आहे. अनलॉकनंतर काही छायाचित्रकार आणि चित्रकारांनी प्रदर्शनासाठी विचारणा केली आणि तारखाही ‘बुक’ केल्या. पण, आता सगळे पुढे ढकलण्यात आले आहे.
---