कोरोनाचे संकट टळले नाही, सावधानता बाळगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:27 AM2020-12-13T04:27:10+5:302020-12-13T04:27:10+5:30

भोर: कोरोना महामारीच्या काळात नागरिकांनी केलेले सहकार्य कौतुकास्पद आहे. कोराचे संकट अजून टळले नाही. हलगर्जीपणा न करता ...

The Corona crisis is not over, be careful | कोरोनाचे संकट टळले नाही, सावधानता बाळगा

कोरोनाचे संकट टळले नाही, सावधानता बाळगा

Next

भोर: कोरोना महामारीच्या काळात नागरिकांनी केलेले सहकार्य कौतुकास्पद आहे. कोराचे संकट अजून टळले नाही. हलगर्जीपणा न करता सावधानता बाळगावी. नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन भोर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा पौर्णिमा आवारे यांनी केले.

कोरोना काळात काम करणाऱ्या विविध सेवाभावी संस्था,व्यापारी,पञकार,शासकीय अधिकारी,कर्मचारी यांचा सन्मानपञ वृक्षाची रोपे देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. या वेळी मुख्याधिकारी डाॅ. विजयकुमार थोरात, पोलीस निरिक्षक राजू मोरे, गट नेते सचिन हर्णसकर, अनिल पवार, तृप्ती किरवे, सुमंत शेटे, गणेश पवार, आशा रोमण, अमृता बहिरट, डाॅ अमित शेठ, अरुण बुरांडे, अँड जयश्री शिंदे आदी उपस्थित होते.

डाॅ विजयकुमार थोरात म्हणाले, संकट काळात पोलीस प्रशासनाने लोकांचा रोष पत्करुन बेशिस्त नागरिकांना शिस्त लावली. त्याचबरोबर काही सामाजिक संघटनांनी आरोग्य साहित्य त्याचबरोबर रुग्णवाहिका देऊन् मोलाची मदत केली. त्यामुळे संकटकाळी त्यांनी केलेली मदत मोलाची आहे असे थोरात यांनी म्हंटले. सूत्रसंचलन प्रा.डाॅ.संजय देवकर यांनी केले.

Web Title: The Corona crisis is not over, be careful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.