आंबेगाव तालुक्यात कोरोनाचा विस्पोट,एकाच दिवशी 47 पॉझिटिव्ह रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:12 AM2021-03-18T04:12:32+5:302021-03-18T04:12:32+5:30

मागील काही महिन्यांपासून कमी असलेली आकडेवारी पुन्हा वाढायला सुरुवात झाली असल्याचे दिसून येत आहे. आंबेगाव तालुक्यात मागील वर्षी नोव्हेंबर ...

Corona eruption in Ambegaon taluka, 47 positive patients on the same day | आंबेगाव तालुक्यात कोरोनाचा विस्पोट,एकाच दिवशी 47 पॉझिटिव्ह रुग्ण

आंबेगाव तालुक्यात कोरोनाचा विस्पोट,एकाच दिवशी 47 पॉझिटिव्ह रुग्ण

Next

मागील काही महिन्यांपासून कमी असलेली आकडेवारी पुन्हा वाढायला सुरुवात झाली असल्याचे दिसून येत आहे.

आंबेगाव तालुक्यात मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली होती. मार्च महिना सुरू झाल्यापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली असल्याचे चित्र दिसत आहे. आज आलेल्या अहवालात मंचर ,घोडेगाव या मोठ्या शहरात प्रत्येकी दहा रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे या शहरात रुग्ण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर अवसरी खुर्द येथे पाच, महाळुंगे पडवळ, सुपेधर,रांजणी कळंब, निरगुडसर, वडगाव काशिंबेग, पारगाव या ठिकाणी प्रत्येकी दोन रुग्ण आढळून आले आहेत. दरेकरवाडी, फुलावडे,वळती,गावडेवाडी,भागडी पिंपळगाव,खडकी,नागापूर येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. तालुक्यात आतापर्यंत एकूण ५ हजार ३०३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यापैकी ४ हजार ९६० रुग्ण उपचारानंतर घरी परतले आहेत. तर २२२ रुग्णांवर उपचार सुरू असून १२१ रुग्ण मयत असल्याची माहिती उपलब्ध होत आहे. दरम्यान कोरोना वाढत असताना नागरिक कुठलीही काळजी घेताना दिसत नाहीत. सर्वच ठिकाणी गर्दी ओसंडून वाहत आहे. सोशल डिस्टन्सचा तर फज्जा उडाला आहे. नागरिक मास्क घालण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे कोरोना वाढू लागला आहे. रविवारी 12, सोमवारी 31 तर मंगळवारी 18 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते.

Web Title: Corona eruption in Ambegaon taluka, 47 positive patients on the same day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.