कोरोना मृतदेहांना वैकुंठात मनाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:09 AM2021-04-11T04:09:43+5:302021-04-11T04:09:43+5:30
महापालिकेने शहरातील सर्व रूग्णालयांचा व्हॉटसॲप ग्रुप केला आहे. २५६ जण या ग्रुपवर आहेत. रूग्ण मृत झाला की त्याची माहिती ...
महापालिकेने शहरातील सर्व रूग्णालयांचा व्हॉटसॲप ग्रुप केला आहे. २५६ जण या ग्रुपवर आहेत. रूग्ण मृत झाला की त्याची माहिती या ग्रुपवर टाकतात. महापालिका त्याचा ऑन लाईन पास तयार करते. तो शववाहिकांच्या ग्रुपवर जातो. तिथून कोणत्या स्मशानभूमीत जागा उपलब्ध आहे ते कळवले जाते. ती माहिती नातेवाईकाला दिली जाते. मृतदेह नातेवाईकांना दिला जात नाही. थेट शववाहिकेत व तिथून स्मशानभूमीत नेला जातो. नातेवाईकांनी त्यामागे जायचे व जागा मिळाली की अंतिम संस्काराला उपस्थित रहायचे.
महापालिकेचे वरिष्ठ अभियंता श्रीनिवास कंदूल यांच्याकडे या सर्व व्यवस्थेची जबाबदारी आहे.
---///
तारेवरची कसरत
जागा उपलब्ध व्हावी यासाठी प्रतीक्षा करावी लागते हे खरे आहे. मात्र आपल्याकडे अजूनही इतर शहरांसारखी स्थिती नाही. तरीही तारेवरची कसरत करावीच लागते.
हे सगळेच विषण्ण करणारे आहे.
श्रीनिवास कंदूल- वरिष्ठ अभियंता