कोरोना नायकांचा कोरोना नायिकांकडून सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 09:38 AM2020-11-22T09:38:08+5:302020-11-22T09:38:08+5:30
पुणे : कोरोना काळात सलग २४६ दिवस सातत्याने सामाजिक काम करणाºया वंदे मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांचा झोपडपट्टीत राहून कोरोनाशी यशस्वी ...
पुणे : कोरोना काळात सलग २४६ दिवस सातत्याने सामाजिक काम करणाºया वंदे मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांचा झोपडपट्टीत राहून कोरोनाशी यशस्वी सामना करणाऱ्या आजीकडून सत्कार केला. ‘कोरोना नायकांचा कोरोना नायिकेकडून सत्कार’ अशा शब्दात उपस्थितांनी या सत्काराचे वर्णन केले. मार्च ते नोव्हेंबर या काळात संघटनेचे सर्व कार्यकर्ते गरीब वस्त्यांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना अन्नधान्याची मदत करत होते. फक्त पुण्यातच नव्हे तर कोकण, सातारा, सांगली, कोल्हापूर व काहीजणांनी तर थेट दिल्ली, जम्मू, काश्मिर, पंजाब या राज्यांमध्ये जाऊन तिथेही स्थानिक कार्यकर्त्यांच्या साह्याने संघटनेच्या सामाजिक कामाची मुहुर्तमेढ रोवली. जूने कपडे, औषधे, धान्य अशी सर्व प्रकारची मदत दानशूर व्यक्तींकडून घेऊन ती या गरजू कुटुंबांना पोहचवण्यात आली. अॅड. अमोल ढमाले यांनी त्यांना सहकार्य केले. कार्यक्रमाला सचिन जामगे, महेश बाटले, सचिन कर्वे, किरण राऊत , उद्धव काळे, यज्ञेश मोरे उपस्थित होते.