पुणे विभागात कोरोना बाधितांमध्ये ५४ ने वाढ, एकूण बाधित १०८५ : डॉ. दीपक म्हैसेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 09:28 PM2020-04-24T21:28:46+5:302020-04-24T21:37:14+5:30
पुणे विभागात १८१ कोरोना बाधित रुग्ण बरे..
पुणे : विभागातील कोरोना बाधित रुग्णांची संख्येत आज ५४ ने वाढ झाली. बाधितांची विभागातील एकूण संख्या १०८५ झाली आहे. पुणे विभागात (पुणे,सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर) १८१ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले. त्यांना घरी सोडण्यात आले. ॲक्टीव रुग्ण ८३१आहेत. विभागात कोरोनाबाधित म्रुत्यूच्या संख्येत ८ ने वाढ झाली. विभागात एकुण ७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ३८ रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
आजपर्यंत विभागामध्ये एकूण १२ हजार ७५५ नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी १२ हजार ८६ चा अहवाल प्राप्त आहे. ६६९ नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी १० हजार ९३९ नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून १ हजार ८५ चा अहवाल पॉझेटिव्ह आहे.
आजपर्यंत विभागामधील ४९ लाख ५८ हजार ९७७ घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. त्या अंतर्गत १ कोटी ९१ लाख १६ हजार ४६४ व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी ९८९ व्यक्तींना अधिक तपासणीसाठी सुचित करण्यात आले आहे
पुणे जिल्हा: ९८५ बाधित मृत्यू:६७.
सातारा:२१बाधित, मृत्यू: २
सोलापूर: ४१ बाधित,मृत्यू: ३.
सांगली :२८ बाधित रुग्ण मृत्यू: १
. कोल्हापूर: १० बाधित, मृत्यू: ०