भिगवण परिसरात कोरोनाचा पहिला रुग्ण; ६५ वर्षीय महिलेला लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 03:57 PM2020-04-28T15:57:52+5:302020-04-28T15:58:33+5:30

बारामती येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाली होती. याचवेळी तिला याची लागण झाल्याची शक्यता

corona infection to 65 years old women In the Bhigwan area | भिगवण परिसरात कोरोनाचा पहिला रुग्ण; ६५ वर्षीय महिलेला लागण

भिगवण परिसरात कोरोनाचा पहिला रुग्ण; ६५ वर्षीय महिलेला लागण

Next

भिगवण : भिगवण परिसरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याने परिसरात खळबळजनक परिस्थितीत निर्माण झाली आहे.पोलीस प्रशासनाने गेल्या महिनाभरापासून नागरिकांकडून अत्यंत काटेकोर लोकडाऊन चे पालन करूनही रुग्ण आढळून आल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे .
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भिगवण परिसरातील ही कोरोनाबाधित रुग्ण ही ६५ वर्षीय महिला आहे. काही दिवसापूर्वी ती महिला बारामती येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाली होती. याचवेळी तिला याची लागण झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.तर भिगवण येथील खासगी दवाखान्यात गेली ३ दिवस उपचार घेत असताना तिला ताप आणि श्वास घेण्यासाठी अडचण निर्माण होत असल्यामुळे भिगवण येथील खासगी आय सी यु मध्ये सेकंड ओपिनियन घेण्यासाठी गेले असता त्यांना पुणे येथे कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.पुणे येथे त्यांची तपासणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती आहे. ही महिला दवाखान्यात तसेच घरी अनेकांच्या संपर्कांत आली असल्याची माहिती समोर येत असल्याने पोलीस प्रशासना पुढे आव्हान निर्माण झाले असल्याचे दिसून येते.भिगवण करांनी गेल्या महिनाभरा पासून अत्यंत काटेकोरपणे लोकडाऊन पाळूनही रुंग्न सापडल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: corona infection to 65 years old women In the Bhigwan area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.