कोरोना संसर्ग उरुळी कांचन परिसराची पाठ सोडेना, पाच दिवसांत ५६ जण बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:07 AM2021-03-30T04:07:28+5:302021-03-30T04:07:28+5:30
उरुळी कांचन हे हवेली तालुक्यातील पूर्व भागातील एक मोठी बाजारपेठ असलेले गाव असून या गावांमध्ये परिसरातून सुमारे पंधरा गावांचे ...
उरुळी कांचन हे हवेली तालुक्यातील पूर्व भागातील एक मोठी बाजारपेठ असलेले गाव असून या गावांमध्ये परिसरातून सुमारे पंधरा गावांचे नागरिक तसेच नऊ - दहा वाड्या वस्त्यांवरील नागरिक आपल्या गरजा भागवण्यासाठी व या ठिकाणाहून अन्यत्र जाण्या - येण्यासाठी येत असतात, तसेच शेतकरी वर्ग आपल्या शेतातील उत्पादित मालाच्या विक्रीसाठी उरुळी कांचन मध्ये घेऊन येत असतो, तो खरेदी करण्यासाठी अगदी लोणावळा ते दौंड पासूनचे व्यापारी उरुळी कांचन परिसरात येत असतात, मात्र या व्यापारी व शेतकरी वर्गाकडून प्रतिबंधासाठी लागू केलेले नियम व निर्बंध पाळण्याऐवजी पायदळी तुडवण्याची स्पर्धा लागली की काय असे वातावरण दिसून येत आहे रविवार आठवडा बाजाराचा दिवस मात्र या बाजारात व्यापारी अथवा ग्राहक कोणत्याही प्रकारे कोरोना प्रतिबंधासाठीचे सामाजिक अंतर, मास्क उपाय व नियम पाळत नसल्याचेच दिसून आले आहे. यापुढील काळात उरुळी कांचन व परिसरातील नागरिकांकडून कोरोना प्रतिबंध टाळण्यासाठी नियमांचे पालन न झाल्यास त्यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई करण्याची मागणी जनतेकडून होत आहे.
कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून उरुळीकांचन मध्ये आजपर्यंत १३५६ रुग्ण कोरोनाबाधित झाले असून त्यापैकी ११९५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत, तर आजमितीला १२७ रुग्ण ॲक्टिव्ह असून सुमारे ३४ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.
उरुळी कांचन येथील आठवडे बाजारात प्रतिबंधक उपाय पायदळी तुडवल्याचे चित्र.