गुरुवारीही कोरोनाबाधितांची वाढ, ७६६ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:14 AM2021-02-26T04:14:20+5:302021-02-26T04:14:20+5:30

पुणे : शहरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत या आठवड्यात नित्याने वाढ होत असून, गुरुवारीही नवे ७६६ कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ ...

Corona infestation also increased on Thursday, 766 new patients | गुरुवारीही कोरोनाबाधितांची वाढ, ७६६ नवे रुग्ण

गुरुवारीही कोरोनाबाधितांची वाढ, ७६६ नवे रुग्ण

Next

पुणे : शहरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत या आठवड्यात नित्याने वाढ होत असून, गुरुवारीही नवे ७६६ कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ आज दिवसभरात शहरातील विविध प्रयोगशाळांमध्ये ६ हजार ५५६ संशयितांची तपासणी केली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची ही टक्केवारी ११़ ६८ टक्के इतकी आहे़

फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे़ यामध्ये सर्वाधिक वाढ उपनगरांमध्येच असून, शहराच्या मध्यवर्ती भागातील वाढ मात्र उपनगराच्या तुलनेने खूपच कमी आहे़

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार : सायंकाळी सहावाजेपर्यंत शहरातील विविध रुग्णालयांत ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या ४२८ इतकी असून, शहरातील गंभीर रुग्णसंख्या ही २३१ इतकी आहे़ तर आज दिवसभरात ३९१ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले असून, शहरातील सक्रिय रुग्ण संख्या ही ३ हजार ९३० इतकी झाली आहे़

शहरात आजपर्यंत ११ लाख २१ हजार २२४ हजार जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी २ लाख ४६२ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ९१ हजार ६९१ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज दिवसभरात ७ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ३ जण पुण्याबाहेरील आहेत़ आजपर्यंत शहरात कोरोनामुळे ४ हजार ८४१ जणांचा मृत्यू झाला आहे़

--------------------------

शहरातील पंधरा क्षेत्रीय कार्यालयनिहाय कोरोनाबाधितांची वाढ

२४ फेब्रुवारी २५ फेब्रुवारी

औंध-बाणेर ५३ ४६

भवानी पेठ २३ ३६

धनकवडी-सहकारनगर ७२ ६६

ढोले पाटील रोड ३० २९

हडपसर-मुंढवा ९१ ७५

कसबा-विश्रामबाग ६१ ६२

कोंढवा-येवलेवाडी २६ ३६

कोथरूड-बावधान ६० ८७

नगर रोड- वडगाव शेरी ७० ६३

शिवाजीनगर-घोलेरोड २८ २७

सिंहगड रोड ५७ ६०

वानवडी- रामटेकडी ४२ २५

वारजे-कर्वेनगर ६२ ६५

येरवडा- धानोरी २४ ३१

---------------------------------------------------------

Web Title: Corona infestation also increased on Thursday, 766 new patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.