तपासण्या वाढल्या म्हणून बाधित सापडत आहेत, घाबरू नका : जिल्हाधिकारी नवल किशोर राम:

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 07:51 PM2020-04-23T19:51:51+5:302020-04-23T19:54:45+5:30

पुरूषांच्या बरोबरीने महिलांची संख्या दिसून येत आहे ही चिंतेची बाब

Corona inffection patient found due to test increasing , so don't panic : Naval Kishor Ram | तपासण्या वाढल्या म्हणून बाधित सापडत आहेत, घाबरू नका : जिल्हाधिकारी नवल किशोर राम:

तपासण्या वाढल्या म्हणून बाधित सापडत आहेत, घाबरू नका : जिल्हाधिकारी नवल किशोर राम:

Next
ठळक मुद्दे पुणे व पिंपरी चिंचवड हे महानगर क्षेत्र शासनाने  प्रतिंबंधित क्षेत्र म्हणून घोषित कोणाला संसर्ग होऊ नये यासाठी चाचण्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय

पुणे: शहरात आरोग्य चाचण्या (टेस्ट) करण्याची संख्या वाढवल्याने कोरोना बाधित रूग्ण सापडत आहे. त्यामुळे एकूण संख्येत वाढ होत आहे, मात्र बरे होणाऱ्या रूग्णांचे प्रमाणही वाढत आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी केले.
ते म्हणाले,पूर्व भागात आरोग्य तपासणी करण्याची संख्या वाढवली आहे. पुरूषांच्या बरोबरीने महिला रूग्णही सापडत आहेत. आजार लपवण्याची किंवा अंगावर काढण्याची त्यांची प्रवृत्ती असल्याने हे होत आहे. कोणीही रूग्ण तपासणीविना राहू नये, त्याच्यापासून कोणाला संसर्ग होऊ नये यासाठी चाचण्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातून बाधित सापडत असल्याने प्रशासनाचा हेतू साध्य होत आहे. पण संख्या वाढत असल्याने नागरिक घाबरत असून त्याची चर्चा सुरू असल्याचेही प्रशासनाच्या लक्षात आले आहे. नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, चाचणीसाठी आलेल्या सरकारी आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांना खरी माहिती द्यावी, सहकार्य करावे.
नवलकिशोर राम म्हणाले, नागरिकांंनी काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठीच प्रशासन कडक धोरण राबवत आहे.
पुरूषांच्या बरोबरीने महिलांची संख्या दिसून येत आहे. ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे कामाशिवाय घराबाहेर पडू नका.पुण्यासाठी हा कठीण काळ आहे.सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा.जीवनावश्यक वस्तू एकाचवेळी आणून घ्या. वारंवार वस्तू आणायला बाहेर जाऊ नका.
  सर्दी,ताप,खोकला,थकावट व भूक लागत नसेल तर तातडीने महापालिकेच्या फ्ल्यू हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांना दाखवा.आजार अंगावर काढू नका किंवा लपून ठेऊ नका. वेळेवर उपचार मिळाले,तर रुग्ण बरे होतात,असे आवाहनही त्यांनी केले आहे.
   पुणे व पिंपरी चिंचवड हे महानगर क्षेत्र शासनाने  प्रतिंबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.भाजीपाला देखील कांही दिवस नागरिकांना मिळणार नाही.
    तसेच उद्योजकांनी कामगारांची  व्यवस्था तेथेच करावी.त्यांना अजिबात बाहेर जाता येणार  नाही.त्यासाठी सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
   शेतक?्यांना आवाहन करताना ते म्हणाले,शेतक?्यांनी सुध्दा काळजीपूर्वक शेतीची कामे करावीत. ग्रामीण भागातही कोरोनाची लागण झाली.बिनधास्त राहू नका.काळजी घ्या,असे आवाहनही जिल्हाधिका-यांनी केले आहे.

Web Title: Corona inffection patient found due to test increasing , so don't panic : Naval Kishor Ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.