विमानतळ रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची कोरोना तपासणी महापालिकेकडून तयारी पूर्ण -यंत्रणा उभारली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 04:27 AM2020-11-26T04:27:18+5:302020-11-26T04:27:18+5:30
पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर व राज्य शासनाच्या निर्देषानुसार, पुणे महापालिकेने अन्य राज्यातून रेल्वे आणि विमानाने येणाºया ...
पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर व राज्य शासनाच्या निर्देषानुसार, पुणे महापालिकेने अन्य राज्यातून रेल्वे आणि विमानाने येणाºया प्रवाशांची तपासणी करण्यासाठी यंत्रणा उभारली असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
राज्य शासनाने कोरोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून सर्व यंत्रणांनी खबरदारी घेण्याची सूचना नुकतीच दिली होती़ त्यातच पुण्यातही मागील काही दिवसांत आॅक्टोबरच्या तुलनेत सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे़ त्यामुळे परराज्यातून विशेषत: दिल्लीहून येणाºया सर्व प्रवाशांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे़ यानुसार रेल्वे स्थानकावर लक्षणे असलेल्या रूग्णांची अॅण्टीजेन तपासणी करण्यात येणार आहे़ तर विमानतळावर सर्वच प्रवाशांची आरटीपीसीआर (स्वॅब) तपासणी होणार आहे़
परराज्यातून येणाºया प्रवाशांच्या तपासणीसंदर्भात माहिती देताना महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले, की एअरपोर्ट अॅथॉरिटी आणि रेल्वे प्रशासनातील अधिकाºयांसोबत आज बैठक झाली. या बैठकीमध्ये अन्य राज्यांतून विमानतळावर आणि शहरातील रेल्वे स्थानकांवर येणाºया प्रवाशांची तपासणी करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. पुर्वीचा अनुभव लक्षात घेता कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ही पावले उचलली गेली आहेत़ प्रवाशांच्या तपासणीसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाची यंत्रणा उभी करण्यात येत आहे़ प्रवासी संख्या आणि रेल्वे स्थानकांची संख्या पाहता याबाबतचे नियोजन करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत़
खाजगी बसेस तसेच राज्य परिवहन विभागांच्या बसने येणाºया प्रवाशांच्या तपासणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नियोजन करण्यात येत आहे. स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन येथील एस.टी. स्थानकासोबतच अन्य राज्यातून येणाºया अथवा जाणाºया खाजगी बसेसच्या थांब्यांवरही तपासणीसाठी यंत्रणा निर्माण करण्याची तयारी सुरू करण्याबाबत बैठकांमध्ये चर्चा झाल्याचे विक्रम कुमार यांनी सांगितले़
------------------