मदनवाडी ब्रिजखाली या मोकाट फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:09 AM2021-04-26T04:09:31+5:302021-04-26T04:09:31+5:30

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली. महसूल विभाग तसेच आरोग्य विभागाकडून करण्यात आलेल्या या तपासणीत २२४ पैकी २६ ...

Corona inspection of these wandering citizens under Madanwadi bridge | मदनवाडी ब्रिजखाली या मोकाट फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना तपासणी

मदनवाडी ब्रिजखाली या मोकाट फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना तपासणी

Next

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली. महसूल विभाग तसेच आरोग्य विभागाकडून करण्यात आलेल्या या तपासणीत २२४ पैकी २६ नागरिक पॉझिटिव्ह आल्याची माहिती प्रयोगशाळा तंत्रज्ञ सुनीता पाळंदे यांनी दिली.यावेळी तहसीलदार अनिल ठोंबरे ,तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.यावेळी भिगवण पोलिसांनी २५ पोलीस कर्मचारी होमगार्ड यांचा बंदोबस्त लावीत चारही बाजूने येनाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना थांबवून कोरोना तपासणी केली. अनेक नागरिक पोलिसांना आपण दवाखान्यात चाललोय ,मेडिकल मध्ये चाललोय ,दवाखान्यात डबा देण्यासाठी चाललोय अशी कारणे देत होते .मात्र पोलीस कोणाचेही कारण न एकता तपासणी करण्यास लावत होते.याकामी आरोग्य विभागाच्या प्रयोग शाळा तंत्रज्ञ सुनीता पाळंदे ,लॅब टेक्निशन प्रवीण बनसुडे ,आरोग्य सेविका रेश्मा भिंगारदिवे ,तलाठी भारती तसेच शिवाजी शेलार यांनी तपासणीचे कामात मदत केली .

यावेळी पोलीस अधिकारी जीवन माने यांनी मोकार फिरणाऱ्या २२४ पैकी २६ जण पॉझिटिव्ह आल्याने त्यांना उपचारासाठी कोविड सेंटर येथे पाठविल्याचे सांगितले.तसेच लक्षणे दिसणाऱ्या नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता तपासणी करून घेण्याचे आवाहन केले.तसेच मोकार फिरणाऱ्या विरोधात वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश झाल्यावर पुन्हा ही कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Web Title: Corona inspection of these wandering citizens under Madanwadi bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.