कोरोनाने दीड हजार बालकांनी गमावले पालकत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:11 AM2021-07-31T04:11:27+5:302021-07-31T04:11:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या एक हजार ६२० बालकांची आतापर्यंत नोंद झाली आहे. या ...

Corona lost custody of one and a half thousand children | कोरोनाने दीड हजार बालकांनी गमावले पालकत्व

कोरोनाने दीड हजार बालकांनी गमावले पालकत्व

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्ह्यात कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या एक हजार ६२० बालकांची आतापर्यंत नोंद झाली आहे. या बालकांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी, शिक्षण विभागाने पूर्ण खबरदारी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.

बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी जिल्हास्तरीय कृतिदलाची (टास्क फोर्स) बैठक जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अश्विनी कांबळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी परम आनंद व कृती दलाचे सदस्य उपस्थित होते.

डॉ. देशमुख म्हणाले की, कोरोनामुळे अनेक बालकांनी दोन्ही पालकत्व गमावले आहे. अशी बालके शिक्षणापासून वंचित राहू नये, याची शिक्षणाधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी. यासाठी तालुकास्तरावर बालकांची माहिती संकलित करून शैक्षणिक सुविधा उपलब्ध कराव्यात. त्याचबरोबर या बालकांचे समुपदेशन करून शासकीस मदत मिळण्यासाठी त्यांचे घराजवळीत बँकेत खाते उघडण्यात यावे. यासंदर्भात काही अडचणी असल्यास जिल्हा कार्यालयाकडून संबंधित बँक अधिकाऱ्यांना सूचना द्यावा. याशिवाय या बालकांचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्वरित कार्यवाही करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.

विधवा महिलांना आधार

कोरोनामुळे पतीचे निधन झालेल्या विधवा महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळण्यासाठी कार्यवाही करावी. याशिवाय दोन्ही पालकत्व गमावलेल्या बालकांची नावे त्याचप्रमाणे एक पालक कोरोनाने दगावल्याने संरक्षणाची गरज असलेले बालक व विधवा झालेल्या महिलांची नोंद वारसदार म्हणून लावण्यासाठी संबंधित शाखेमार्फत कार्यवाही करण्यात येत असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.

दहा वर्षांखालील ज्या बालकांचे दोन्ही पालक दगावले आहेत, अशा बालकांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रतिपालकत्व करणे आवश्यक आहे. त्याकरिता जिल्हा न्यायालयामार्फत प्रक्रिया करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर बालकांना त्यांचा वारसा हक्क मिळवून देण्याबाबतही तहसीलदारांना आदेश दिले आहेत.

-डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

Web Title: Corona lost custody of one and a half thousand children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.