कोरोनामुळे नोकरी गेल्याने मुलांची लग्नं जुळणे कठीण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:11 AM2021-04-12T04:11:04+5:302021-04-12T04:11:04+5:30
लग्न जोडणी म्हटलं की पूर्वी शेतीला महत्त्वाचे स्थान होते व मुलगा काय करतो यापेक्षा मुलाकडे किती शेती आहे, कुटुंब ...
लग्न जोडणी म्हटलं की पूर्वी शेतीला महत्त्वाचे स्थान होते व मुलगा काय करतो यापेक्षा मुलाकडे किती शेती आहे, कुटुंब कसे आहे त्याची गावात प्रतिष्ठा कशी आहे, याबाबींना महत्त्व दिले जायचे. मात्र आता काळानुरूप यात बदल झाला आहे. मुलगा शेती करतो असे सांगितले की, मुलीच्या कुटुंबाकडून प्रतिसाद मिळत नसल्याची वास्तविकता आहे. व्यसनाधीन भूमिहीन अल्पभूधारक नव्हे तर शेतकरी तरुणांची लग्न जोडण्याची मोठी सामाजिक समस्या गेल्या काही वर्षापासून निर्माण झाली आहे . अशातच गेल्या वर्षापासून लागलेल्या कोरोना रुपी ग्रहणामुळे शहरात छोटी-मोठी नोकरी करणाऱ्या तरुणाच्या नोकर्या गेल्या .परिणामी नोकरदार तरुण मूळ गावी परतले यामुळे बेरोजगारीत भर पडली. याचा परिणाम भावी नवरदेवाच्या लग्नावर झाला आहे.
प्रत्येक आईवडिलांना आपली मुलगी सधन कुटुंबात पाहावी अशी अपेक्षा असते. नोकरी असलेल्या मुलांना अधिक पसंती दिली जाते, मात्र गरीब असो वा श्रीमंत शेतकरी मुलाला मुलगी देण्यास आई-वडील मागेपुढे पाहतात कोरूनाच्या संकटामुळे अनेक तरुण मोठ्या शहरातून गावात आले काही तरुण पुन्हा शहरात परत गेले .मात्र कोरोनाच्या काळात निर्माण झालेल्या नोकरीच्या अनिश्चित सावटामुळे बरेच युवक खेड्यातच रमले शेती किंवा अन्य व्यवसाय करून लागले. तथापि सद्यस्थितीत उपवर मुलीची संख्या कमी असल्याने तरुणांची लग्न जुळणे कठीण झाले आहे. परिणामी उपवर मुलांच्या वडिलांची फारच दमछाक होत आहे लग्नाचे वय झालेले ही मुले अविवाहित राहण्याची चिंता अनेक मुलांच्या पालकांना सतावत आहे.. मागील एक वर्षात अनेकांचा रोजगार बुडाला. त्यामुळे हाताला काम नाही वधू पित्याकडून कमावत्या वराचा शोध घेतला जातो. मुलगी सुखात नांदत ही त्यांची प्रामाणिक भावना असते. परंतु मागील वर्षभरात अनेक युवकांच्या हाताचे काम केले त्यामुळे कमाई बंद झाली परिणामी अशा अनेक तरुणांचा लग्नात बाधा येत आहेत मुलगा काही कमावत नाहीतर त्याला मुलगी द्यायची कशी असा वधूपिता यांचा प्रश्न असतो त्यातून लग्नाच्या अडचणी वाढल्या आहेत......