पुण्यात पुन्हा कोरोनाचे तांडव, रुग्णालयांत बेड मिळेना, रेमडेसिविरचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:09 AM2021-04-14T04:09:31+5:302021-04-14T04:09:31+5:30
* शहरातील सर्वाधिक रुग्णसंख्या हडपसर, नगर रस्ता, सिंहगड रस्ता, वारजे या उपनगरांमध्ये आहे. झोपडपट्टी बहुल भागात रुग्णसंख्या नगण्य ...
* शहरातील सर्वाधिक रुग्णसंख्या हडपसर, नगर रस्ता, सिंहगड रस्ता, वारजे या उपनगरांमध्ये आहे. झोपडपट्टी बहुल भागात रुग्णसंख्या नगण्य आहे. सोसायटी आणि इमारतींमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत.
* २५ ते ४० वयोगटातील नागरिकांमध्ये संसर्गाचे प्रमाण जास्त आहे. मात्र, ६० वर्षांवरील रुग्णांमध्ये मृत्यूदर जास्त आहे.
* शहरात सध्या बेड उपलब्धच नाहीत. विलगीकरणासाठी महापालिका आणि स्वयंसेवी संस्थांनी व्यवस्था केली आहे.* परंतु, रुग्णालयांमध्ये जागा नाही. महापालिकेने जम्बो कोविड रुग्णालय सुरू केले आहे.* डॉ. नायडू रुग्णालय आणि बाणेर कोविड सेंटर पूर्ण क्षमतेने भरले आहे.* ससून रुग्णालयाची क्षमता वाढविण्यात येत आहे.* व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन खाटांची मागणी वाढत आहे.*
*लसीकरणाचा वेग कमीच आहे. खासगी रुग्णालयांना लस नोंदणी करूनही मिळत नाही. त्यामुळे नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. किमान एक लाख लसींची गरज प्रशासनाने नोंदविली आहे.
* सरकारने निर्बंध लादले असले तरी रस्त्यावरील गर्दी कमी होत नाही. भाजीखरेदीसाठीची गर्दी सर्वाधिक आहे.
कोट
स्वॅब चाचणी वाढविण्यात आली आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यात आला आहे. लसीकरणाचाही वेग वाढविण्यात येत असून केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. यासोबतच गंभीर रुग्णांकरिता खाटांची उपलब्धता वाढविण्यासाठी खासगी रुग्णालयांसोबत बोलणी सुरू आहे.
- डॉ. आशिष भारती, आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका
नागरिकांना लस, पुरेशा खाटा आणि औषधे उपलब्ध करून देण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे. रेमडेसिविर इंजेक्शनकरिता टास्क फोर्स तयार केला आहे. त्यांच्या माध्यमातून गरजुुंना तातडीने इंजेक्शन मिळेल, हे पाहू. नागरिकांनी नियमांचे पालन करून कोरोना साखळी तोडण्यास प्रशासनास नागरिकांनी मदत करावी.
- विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महापालिका