कोरोना प्रादुर्भावामुळे छायाचित्रण व्यावसायाची अवस्था बिकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:10 AM2021-04-13T04:10:33+5:302021-04-13T04:10:33+5:30
मागील वर्षी प्रमाणेच यंदाचा हंगामदेखील हातचा निघून गेला तर वर्षभर उदरनिर्वाह कसा करायचा? हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा ...
मागील वर्षी प्रमाणेच यंदाचा हंगामदेखील हातचा निघून गेला तर वर्षभर उदरनिर्वाह कसा करायचा? हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे. मार्च ते जून हा कालावधी विवाह सोहळे, समारंभांचा असतो. काहींच्या थाटामाठात लग्न करण्याची इच्छा असल्याने या वर्षी लग्न करण्याचा मानस मनी धरला होता. मात्र, वाढत्या कोरोनाच्या प्रभावामुळे यंदा देखील कर्तव्य नसल्याचे सिद्ध झाले. यंदाच्या वर्षी तरी आपल्या विवाहाला मुहूर्त लागेल या हेतूने काहींनी लग्न पूढे ढकलली. ठरलेले विवाह काहींनी दिवाळीनंतर पार पाडण्याचे ठरविले, तर विवाह इच्छुकांनी तर आता पुढील वर्षीच लग्नगाठ बांधण्याचा निश्चय केलेला आहे. मात्र, या लग्नसमारंभावर आधारित व्यवसाय असणाºयांचे मोठे हाल होत आहेत.
मार्च ते जून महिन्यादरम्यान मोठ्या प्रमाणावर लग्नसोहळे आणि सार्वजनिक व घरगुती समारंभांचा हंगाम असतो. मात्र, यंदा कोरोनामुळे या हंगामावरील संकट अधिक गडद झाले आहे. छायाचित्रणाबरोबरच एडिटर, ग्राफिक डिझाइनर, फोटो एडिटर, एक्सपोजिंग त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यात अनेक व्यावसायिकांनी लाखो रुपये गुंतवणूक करून कॅमेरे, संगणक, ड्रोन आणि स्टुडिओ उभारले आहेत. याशिवाय यातून अनेकांना रोजगार मिळत होता. परंतु कोरोना पार्श्वभूमीवर जारीकेलेल्या लॉकडाउनमुळे फोटोग्राफर आता आर्थिक कोंडीत सापडला आहे. यामुळे शासनस्तरावर आर्थिक मदतीचा हात मिळावा, अशी अपेक्षा फोटोग्राफर करू लागले आहेत.
———————————————————
लग्नसराई, व इतर कार्यक्रमांवर आता बंदी घातल्याने आम्हाला कामे मिळत नाहीत. इतर जोड धंदा नसल्यामुळे घर कसे चालवायचे हा प्रश्न सतावत आहे. सध्या सर्व फोटोग्राफर मोठ्या अडचणींना सामोरे जात आहेत. यामुळे शासनस्तरांवर आमचा देखील विचार व्हावा.
- विशाल पोंदकुले
(फोटोग्राफर, सांगवी )