कोरोनाने मृत्यू पावलेल्या रुग्णाच्या उपचाराचा खर्च केला परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:11 AM2021-05-26T04:11:58+5:302021-05-26T04:11:58+5:30

केडगावातील वरद विनायक हॉस्पिटल येथे कोरोनाच्या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यास त्याच्याकडून उपचाराचा खर्च घेणार नाही, शिवाय उपचारावर झालेला खर्चही ...

Corona paid for the treatment of the deceased patient back | कोरोनाने मृत्यू पावलेल्या रुग्णाच्या उपचाराचा खर्च केला परत

कोरोनाने मृत्यू पावलेल्या रुग्णाच्या उपचाराचा खर्च केला परत

Next

केडगावातील वरद विनायक हॉस्पिटल येथे कोरोनाच्या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यास त्याच्याकडून उपचाराचा खर्च घेणार नाही, शिवाय उपचारावर झालेला खर्चही त्याच्या नाते‌वाइकांना परत दिला जाईल, अशी घोषणा हॉस्पिटलचे संचालक डॉ. सचिन भांडवलकर यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्यांच्या या उपक्रमाबद्दल त्यांचे ग्रामस्थांनी धन्यवाद दिले व लोकमतमध्ये त्याचे वृत्तही प्रकाशित झाले होते.

दुर्दैवाने काही दिवसांपूर्वी वरद विनायक हॉस्पिटलमध्ये चंद्रभागा ज्ञानदेव खळदकर (वय ५९) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या उपचारादरम्यान झालेला ३१ हजार रुपयांचा खर्च डॉक्टरांनी त्यांच्या मुलाकडे सुपूर्द केला. चंद्रभागा खळदकर यांना कोरोना झाल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती. त्याचा स्कोअर १५ इतका झाला होता. त्यामुळे त्यांचे निधन झाले होते. त्यामुळे उपचारादरम्यान आलेला ३१ हजार रुपयांचा खर्च डॉ. भांडवलकर यांनी संतोष ज्ञानदेव खळदकर यांच्याकडे धनादेशाव्दारे सुपूर्त केला. या वेळी उपसरपंच संदीप पाटील खळदकर, पोलीस पाटील पोपट लव्हे, ग्रामपंचायत सदस्य सचिन शेलार, विष्णुपंत खराडे, विकास शेलार, तंटामुक्ती अध्यक्ष माऊली खळदकर, सुभाष साळवे, पवन खळदकर, महेश इंगळे, धीरज खळदकर उपस्थित होते.

--

फोटो क्रमांक : २५ केडगाव खळदकर :

फोटो ओळी-

नानगाव तालुका दौंड येथील मयत चंद्रभागा खळदकर यांच्या कुटुंबीयांना ३१ हजार रुपयांचा धनादेश देताना डॉक्टर भांडवलकर कुटुंबीय.

Web Title: Corona paid for the treatment of the deceased patient back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.