कोरोना रुग्णाची ओळख व्हायरल करणे पडले महागात ;  ग्रुप अ‍ॅडमिनसह तिघांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 09:27 PM2020-03-31T21:27:03+5:302020-03-31T21:29:29+5:30

व्हॉट्सअप ग्रुपवर बारामती शहरातील कोरोनाबाधित रुग्णाची छायाचित्रासह ओळख जाहिर केल्याप्रक़रणी ग्रुप अ‍ॅडमिनसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Corona patient identification goes viral; Three offenses with a group admin | कोरोना रुग्णाची ओळख व्हायरल करणे पडले महागात ;  ग्रुप अ‍ॅडमिनसह तिघांवर गुन्हा

कोरोना रुग्णाची ओळख व्हायरल करणे पडले महागात ;  ग्रुप अ‍ॅडमिनसह तिघांवर गुन्हा

Next

पुणे : व्हॉट्सअप ग्रुपवर बारामती शहरातील कोरोनाबाधित रुग्णाची छायाचित्रासह ओळख जाहिर केल्याप्रक़रणी ग्रुप अ‍ॅडमिनसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात  आला आहे.पोलीसांनी याबाबत इशारा दिला होता.मात्र, पोलीसांना न जुमानता ओळख जाहीर करणे महागात पडले आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,याप्रकरणी  पोलीस नाईक पांडुरंग रंगनाथ गोरवे यांनी याप्रकरणी फिर्याद  दिली आहे. त्यानुसार  भा.द.वी.कलम १८८,५०४(२), १०९,३४ राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५,कलम ५२ ,५४ प्रमाणे आरोपी योगेश अरविंद शिरसट (रा.गुणवडी ता.बारामती जि.पुणे),अनुप सुरेश देशमाने (रा.भोईगल्ली बारामती ता.बारामती जि.पुणे) ,सागर राजेंद्र पलंगे (रा.खाटीकगल्ली,बारामती)यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२९ मार्च रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास शिरसट याने त्याचे मोबाईल वरील व्हॉट्सअपवरुन  इतर व्हॉटसअप ग्रुपवर ७ जणांचा एकत्रित छायाचित्र टाकले. त्यामध्ये एकाच्या चित्रावर जांभळ्या रंगाचे गोल मार्किंग केले.ती मार्किंग केलेली व्यक्ति कोरोनाबाधित असल्याचे,त्या व्यक्तिची ओळख जाहीर होईल,असे प्रसारीत केले. त्याखाली त्या रुग्णाच्या परीसराचा उल्लेख करुन त्या ठीकाणी आणखी दोन रुग्ण आढळल्याचा मजकुर लिहून पाठविला. तसेच आरोपी देशमाने याने एका व्हॉट्सअप ग्रुपवर खोटी अफवा पसरविली. ग्रुपमधील सदस्य कोरोना संसर्गाबाबत खोट्या मजकुराचे अफवा पसरविणारे संदेश व्हॉटसअप ग्रुपमध्ये प्रसारीत करुन जनतेत भीतीचे व घबराटीचे वातावरण निर्माण करीत होते. तरी  या ग्रुपचा अ‍ॅडमिन असणाºया पलंगे याने देखील त्या ग्रुपचा अ‍ॅडमिन असताना त्याच्यावर नियंत्रण ठेवले नाहि. आरोपी देशमाने यास अपप्रेरणा देवुन सहाय्य केल्याचे फिर्यादीमध्ये नमुद करण्यात आले आहे.अधिक तपास पोलीस हवालदार अमोल खाडे करीत आहेत.

Web Title: Corona patient identification goes viral; Three offenses with a group admin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.