पुण्यात कोरोना रुग्णसंख्या दर स्थिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:11 AM2021-07-29T04:11:18+5:302021-07-29T04:11:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरात बुधवारी २९४ कोरोनाबाधित आढळले असून, ३४७ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज विविध ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात बुधवारी २९४ कोरोनाबाधित आढळले असून, ३४७ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज विविध तपासणी केंद्रांवर ७ हजार ९३० संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ३.७० टक्के इतकी आढळली.
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही २ हजार ४८८ असून, आज दिवसभरात ९ जणांचा मृत्यू झाला आह़े़ यापैकी २ जण हे पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील आजचा मृत्यूदर हा १़ ७९ टक्के इतका आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्णसंख्या ही २२४ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ३४७ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २८ लाख ५८ हजार ९४ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ८६ हजार ३६५ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी ४ लाख ७५ हजार १२८ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ७४९ जणांचा मृत्यू झाला आहे.