मढ, तळेरान येथे वाढत आहेत कोरोनाचे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:10 AM2021-05-11T04:10:09+5:302021-05-11T04:10:09+5:30
मोहन लांडे मढ तळेरान येथे वाढत आहेत कोरोनाचे रुग्ण : कडक बंदोबस्त व कोविड सेंटर उभारण्याची ग्रामस्थांची मागणी मढ ...
मोहन लांडे
मढ
तळेरान येथे वाढत आहेत कोरोनाचे रुग्ण : कडक बंदोबस्त व कोविड सेंटर उभारण्याची ग्रामस्थांची मागणी
मढ : मढपासून पश्चिमेला आठ किलोमीटर अंतरावर आदिवासी भागातील तळेरान गावात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. तळेरान हे कोरोनाचे हॉटस्पॉट केंद्र बनले आहे. आतापर्यंत जवळजवळ १८ इतकी पॉझिटिव्ह रुग्णसंख्या झालेली असून त्यातील अकरा जण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. तर सात रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोना होईल या भीतीने अनेक नागरिक टेस्ट करून घेण्यासाठी घाबरत आहेत. परिणामी अंगावरच आजार काढत असल्याने आजार बळावून मृत्यू होण्याची वास्तविक परिस्थिती समोर येत आहे. लेण्याद्री तसेच ओझर कोविड केंद्रात उपचाराबाबत अनेक गैरसमज नागरिकांमध्ये असल्याने
त्याचाही परिणाम टेस्ट करून घेण्यावर होत आहे. तळेरान येथे ग्रामपंचायत, प्रशासन, स्थानिक ग्रामस्थ व तरुणांच्या सहकार्याने कोविड केंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.