कोरोना पॉझिटिव्हिटी रेट तीन टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:11 AM2021-07-28T04:11:18+5:302021-07-28T04:11:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यात कोरोना पॉझिटिव्ह येणाऱ्यांची संख्या कमी होत असून, गेल्या आठवड्यात पॉझिटिव्हिटी रेट हा ...

Corona positivity rate at three percent | कोरोना पॉझिटिव्हिटी रेट तीन टक्क्यांवर

कोरोना पॉझिटिव्हिटी रेट तीन टक्क्यांवर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुण्यात कोरोना पॉझिटिव्ह येणाऱ्यांची संख्या कमी होत असून, गेल्या आठवड्यात पॉझिटिव्हिटी रेट हा २़९८ इतका खाली आला आहे़ यामुळे सध्या असलेल्या निर्बंधामध्ये आणखी शिथिलता देण्याची मागणी सर्वच स्तरावरून होऊ लागली आहे़

पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी घेतलेल्या आढावा बैठकीत शहरातील पॉझिटिव्हीटी रेट हा २़ ९८ टक्के इतका खाली आल्याचे प्रशासनाने सांगितले़ यानुसार शहरातील निर्बंधामध्ये आणखी शिथिलता देण्याची सकारात्मक चर्चाही झाली़ मात्र अद्यापही शासन स्तरावरून महापालिकेला निर्देश आलेले नाहीत.

व्यापाºयांवरील निर्बंध उठवा

कोरोनाच्या काळात व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. राजकारण्यांच्या बैठकांना, कार्यक्रमांना कोणतेही निर्बंध नाही. तर दुसरीकडे व्यापाºयांनी दुकाने सुरू केली कोरोना वाढतो, हे न समजणारे कोडे आहे. पुणे शहराचा पॉझिटिव्हिटी दर ३ टक्क्यांच्या आसपास आला आहे. त्यामुळे राज्य शासनाने गांभिर्याने विचार करून पुणे शहरातील निर्बंध उठवावे, अशी सर्व व्यापाºयांची मागणी आहे.

- वालचंद संचेती, अध्यक्ष, दि फेडरेशन आॅफ असोसिएशन आॅफ ट्रेडर्स (महाराष्ट्र)

Web Title: Corona positivity rate at three percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.