बाबुर्डीत कोरोना प्रतिबंधात्मक फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:06 AM2021-05-03T04:06:39+5:302021-05-03T04:06:39+5:30

या परिसरात औषध फवारणीकरिता दोनशे लिटरला क्षमतेच्या बॅलरला ५०० रुपये घेतले जातात. त्यामुळे बाबुर्डी गावठाण आणि वाडीवस्त्या मिळून दोनशे ...

Corona preventive spraying in Baburdi | बाबुर्डीत कोरोना प्रतिबंधात्मक फवारणी

बाबुर्डीत कोरोना प्रतिबंधात्मक फवारणी

Next

या परिसरात औषध फवारणीकरिता दोनशे लिटरला क्षमतेच्या बॅलरला ५०० रुपये घेतले जातात. त्यामुळे बाबुर्डी गावठाण आणि वाडीवस्त्या मिळून दोनशे लिटरचे ८० ते ९० बॅलरची फवारणी करावी लागणार होती. त्यासाठी किमान ४० ते ४५ हजार रुपये एवढा खर्च येणार होता. या खर्चाला फाटा देऊन गावातील तरुण मुलांनी एकत्र येऊन गावात ६ हजार लिटर पाणी क्षमतेच्या टाकीलाच एसटीपी पंप बसवून फवारणीच्या कामाला सुरुवात केली. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या होणाऱ्या सुमारे ४० हजार रुपये खर्चाची बचत झाली.

दरम्यान, बाबुर्डी गावठाण, ढोपरेमळा गायकवाडमळा, लव्हेगोठा आदी ठिकाणी फवारणीचे काम पूर्ण झाले आहे. तर शेरेचीवाडी आणि लव्हे मळा आदी ठिकाणच्या फवारणीचे काम सुरु असल्याची माहिती सरपंच ज्ञानेश्वर पोमणे यांनी दिली.

याप्रसंगी सरपंच ज्ञानेश्वर पोमणे, ग्रामसेवक मधुकर जगताप, राजकुमार लव्हे यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश जगताप, सुनील जगताप, गोरख खोमणे, बापू शेंडे, गोविंद बाचकर, समीर इनामदार, सुरेश राऊत आदी तरुणांनी पुढाकार घेऊन फवारणीचा कार्यक्रम यशस्वी केला.

बाबुर्डीत तरुणांच्या पुढाकारातून गावठाणमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक फवारणी करण्यात आली.

Web Title: Corona preventive spraying in Baburdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.