निमसाखर मध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:09 AM2021-04-04T04:09:53+5:302021-04-04T04:09:53+5:30

यावेळी ४५ वर्षांपुढील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लसीचे लसीकरण करण्यात आले असून निमसाखरमधील सुमारे एक हजार नागरिकांना लसीकरण ...

Corona preventive vaccination in semi-sugar | निमसाखर मध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण

निमसाखर मध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण

Next

यावेळी ४५ वर्षांपुढील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लसीचे लसीकरण करण्यात आले असून निमसाखरमधील सुमारे एक हजार नागरिकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने समोर ठेवले असल्याची माहिती निमसाखर येथील आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नानासाहेब तरंगे यांनी दिली.तर लसीकरण केल्यानंतर नागरिकांना दक्षता म्हणून काही वेळ विश्रांतीसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे व्यवस्था आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आली .४५ वर्षां पुढील नागरिकांना लस घेण्यासाठी प्रवृत्त करणार असल्याचे निमसाखर ग्रामपंचायतीचे सरपंच धैर्यशील रणवरे यांनी सांगितले.

यावेळी इंदापूर तालुका आरोग्य कोरोना विभागाचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत महाजन यांनी लसीकरण मोहीम सुरु असलेल्या प्राथमिक आरोग्य ऊपकेंद्र निमसाखर या ठिकाणी भेट दिली. यावेळी आरोग्य सेवक सुरेश कांबळे, आरोग्य सहाय्यीका सुवर्णा शिरसट,ग्रामविकास अधिकारी सुधाकर भिलारे, अशा सुपरवायझर कल्पना लावंड, अशा कार्यकर्त्या यांनी काम पाहिले.

यावेळी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजित रणवरे, ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार रणवरे, शेखर पानसरे, अतुल जाधव

फोटो ओळी

निमसाखर येथील प्राथमिक आरोग्य ऊपकेंद्र येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरणा दरम्यान उपस्थित

Web Title: Corona preventive vaccination in semi-sugar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.