पुरंदर तालुक्यात १५० रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:11 AM2021-04-08T04:11:30+5:302021-04-08T04:11:30+5:30

पुरंदर तालुक्यात बुधवारी (दि. ७) ३२४ संशयित रुग्णांची कोरोना तपासणी सासवड व जेजुरी येथील शासकीय लॅबमध्ये करण्यात आली. यापैकी ...

Corona report of 150 patients affected in Purandar taluka. | पुरंदर तालुक्यात १५० रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित.

पुरंदर तालुक्यात १५० रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित.

Next

पुरंदर तालुक्यात बुधवारी (दि. ७) ३२४ संशयित रुग्णांची कोरोना तपासणी सासवड व जेजुरी येथील शासकीय लॅबमध्ये करण्यात आली. यापैकी १४४ रूग्णांचे अहवाल पाँझिटिव्ह आले आहेत, तर नीरा येथील ६ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. सासवड व जेजुरी शहरांमधील मिळून ६६ रूग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत.

सासवड येथील शासकीय लॅबमध्ये बुधवारी १९ गावांतील २४३ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी ९९ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत. सासवड शहरांमधील ५७, भिवडी १६, खळद, पारगाव मेमाणे, सिंगापूर, पवारवाडी, माळशिरस, सुपे खुर्द, टेकवडी , जेजुरी येथील प्रत्येकी २, हिवरे, शिवरी, आंबळे, काळेवाडी, ढुमेवाडी, पिंपळे, वाळुंज, वीर, पांडेश्वर येथील प्रत्येकी १, तसेच तालुक्याबाहेरील भेकराईनगर येथील १ रूग्ण असे एकूण ९९ रूग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत.

जेजुरी येथील शासकीय लॅबमध्ये ८१ संशयीत रुग्णांची कोरोना तपासणी करण्यात आली. यापैकी ४५ रूग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत.

जेजुरी ९, सिमलेस कॉलनी १२, वाल्हे ४, नाझरे सुपे, राजुरी, लवथळेश्वर, कोळविहिरे, वाळुंज प्रत्येकी २, शिवरी, मांडकी, पांडेश्वर, खळद, पारगाव, पिंपरी मावडी, मुर्टी येथील प्रत्येकी १ रूग्ण. तसेच तालुक्याबाहेरील चिंचवड व भेकराईनगर येथील प्रत्येकी १ असे एकूण ४५ रूग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत.

नीरा येथील प्राथमिक आरोग्या केंद्रात ६ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. नीरा शहर ५ तर ज्युबिलंट कंपनी वसाहत १ रुग्णाचा अहवाल बाधित आला आहे.

Web Title: Corona report of 150 patients affected in Purandar taluka.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.