भोर तालुक्यातील कोरोना आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:11 AM2021-04-14T04:11:41+5:302021-04-14T04:11:41+5:30
आमदार संग्राम थोपटे यांनी आज भोर तालुक्यातील कोविड १९ आजाराच्या संदर्भात रायरेश्वर डोंगरी परिषद कार्यालय भोर येथे आढावा बैठक ...
आमदार संग्राम थोपटे यांनी आज भोर तालुक्यातील कोविड १९ आजाराच्या संदर्भात रायरेश्वर डोंगरी परिषद कार्यालय भोर येथे आढावा बैठक घेतली. या वेळी उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार अजित पाटील, गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. दत्तात्रय बामणे, आरोग्य अधिकारी सूर्यकांत काऱ्हाळे, मुख्याधिकारी डाॅ. विजयकुमार थोरात, पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे उपस्थित होते.
भोर शहरात साधारणत: १० हजार लसीकरणाचे उद्दिष्ट असून, पैकी आतापर्यंत केवळ १ हजार ३०० नागरिकांना लस देण्यात आली असून, भोर शहरातील गणेश पेठेतील शाळा क्र. ३ येथे नवीन लसीकरण केंद्र सुरु करण्यात येणार असून, या ठिकाणी जाऊन नागरिकांनी लस घ्यावी. त्याचप्रमाणे भोर तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता भोर शहरातील हरजीवन हॉस्पिटल, गोरेगावकर हॉस्पिटल व वेळू येथील सिद्धिविनायक हॉस्पिटल या खाजगी हॉस्पिटलमध्ये नवीन कोविड सेंटर सुरु करण्यात येणार असून, ठिकाणी सर्व सुविधा रुग्णांना मिळाव्यात यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.