बारामतीत कोरोना नियमावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:10 AM2021-04-27T04:10:36+5:302021-04-27T04:10:36+5:30
शहर पोलिसांनी केली कारवाई बारामती : बारामती शहरात वाढत्या कोरोनाबाधितांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अधिक सतर्क झाले ...
शहर पोलिसांनी केली कारवाई
बारामती : बारामती शहरात वाढत्या कोरोनाबाधितांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या नियमावलीचे कठोर पालन सुरू आहे. या अंतर्गत पोलिसांनी हॉटेल- परमिट रुममधून बेकायदेशीरपणे होणारी दारू विक्री उघड करत कारवाई केली आहे. रविवारी (दि. २५) रोजी ही कारवाई करण्यात आली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार: पोलीस कर्मचारी गौरव ठोंबरे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार हॉटेलचालक अतुल उद्धव पवार, कुमार बाबू सोलापुरे, राहुल अरुण खरात यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी (दि. २५) रोजी ही कारवाई करण्यात आली. शासनाने ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. हॉटेल-परमिट रुम बंद केले आहेत. तरीही येथील फलटण रस्त्यावरील स्नेहा हॉटेल व परमिट रुममधून नागरिकांना दारु दिली जात होती. पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांना मळद येथील पदाधिकाऱ्यांनी ही बाब कळविली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी शेंडगे, हवालदार मोघे, होमगार्ड व दोन पंचांनी येथे छापा टाकला. या वेळी हॉटेलबाहेर बनसोडे व गावडे उभे होते. त्यांनी येथूनच दारु खरेदी करून ती पिशवीत ठेवल्याचे पोलिसांना दाखविले. मुख्य गेटला कुलूप लावण्यात आले होते. कंपाऊंडवरून उड्या मारून पोलीस आत गेले. यावेळी अतुल पवार याने पोलीस आले आहेत, असा जोराचा आरडाओरडा करत तो तेथून पळून गेला. कुमार सोलापुरे व राहुल खरात हे दोघे कामगार तेथे आढळून आले. पोलिसांनी तेथील दारुचा साठा तपासला. तेथे सुमारे ५० हजार रुपयांची दारु आढळून आली. पोलिसांनी याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
————————————————