Corona Vaccination In Pune : पुणे महापालिकेच्या ५७ दवाखान्यात उद्या कोव्हीशील्ड लस उपलब्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 07:38 PM2021-08-08T19:38:18+5:302021-08-08T19:38:26+5:30
ससूनसह ७ दवाखान्यात कोव्हॅक्सिन लस उपलब्ध
पुणे : शहरातील महापालिकेच्या ५७ दवाखान्यात उद्या (सोमवारी) कोव्हिशिल्ड लस उपलब्ध राहणार आहे. तर ससूनसह ७ दवाखान्यात कोव्हॅक्सिन लस उपलब्ध राहणार आहे.
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, लसीच्या उपलब्ध साठ्यापैकी १८ वर्षांवरील नागरिकांना २० टक्के लस ही ऑनलाईन बुकिंगव्दारे, तर २० टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून मिळणार आहे.
कोव्हिशिल्ड लसीच्या उर्वरित साठ्यापैकी ३० टक्के लस ही ८४ दिवस पूर्ण झालेल्यांना ( १६ मे पूर्वी लस घेतलेल्यांना) ऑनलाईन बुकिंगव्दारे तर ३० टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून दुसरा डोस म्हणून मिळणार आहे.
लसीकरणाकरिता बुकिंग करण्यासाठी सकाळी ८ वाजता ऑनलाईन स्लॉट ओपन होणार आहे. तसेच सेशन संपण्यापूर्वी उघडलेल्या लसीच्या कुपीत लस शिल्लक राहिल्यास ऑन द स्पॉट नोंदणी करून उपलब्ध लस नागरिकांना देण्यात यावी. अशा सूचना प्रत्येक लसीकरण केंद्रास देण्यात आल्या आहेत.