"कोरोना नष्ट व्हावा व सामान्य जनजीवन व वारी पुन्हा पूर्वीच्याच दिमाखाने साजरी व्हावी"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 08:26 PM2021-07-02T20:26:40+5:302021-07-02T20:31:04+5:30
Neelam Gorhe : विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे यांनी आळंदी येथील संजीवनी समाधीस पुष्पहार अर्पण केला
आळंदी - आषाढी व कार्तिकी हे महाराष्ट्राच्या समाज जीवनाचे अभिन्न अंग आसून शेकडो वर्ष पंढरीच्या वारीचे लाखो वारकरी व नागरिक या आनंद सोहळ्यात सहभागी होतात. मात्र कोरोना महामारीमुळे मोजक्याच भक्तांच्या सहभागाने हा सोहळा तितक्याच उत्साहाने संपन्न होत आहे. आज संतशिरोमणि श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होत आहे. या निमित्त विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे यांनी आळंदी येथील संजीवनी समाधीस पुष्पहार अर्पण केला. तसेच महाराष्ट्र व देशातील कोरोना नष्ट व्हावा व सामान्य जनजीवन व वारी पुन्हा पूर्वीच्याच दिमाखाने साजरी व्हावी अशी प्रार्थना माऊली चरणी केली.
महाराष्ट्रातील तमाम जनता अगदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवार हा देखील विठ्ठल भक्त आहे आळंदीशी शिवसेनेचे अतूट नाते असल्याचे डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले. वारकरी तर सर्वांमध्ये विठ्ठल पाहतात असे संगितले. तसेच अन्नदानासाठी देणगी डॉ.गोऱ्हे यांनी दिली. तसेच मंदिर परिसरातील ज्याप्रमाणे सजावट आणि व्यवस्था केली आहे ती अतिशय आकर्षक असल्याचे देखील त्या म्हणाल्या.
सन १८९७ मध्ये प्लेगचा प्रार्दुभाव वाढला होता त्यावेळी ज्योतिबाची यात्रा बंद करण्याचा श्रीमन्महाराज छत्रपती शाहू महाराज यांनी निर्णय घेतला होता. याच थोर लोकांच्या पावलावर पाऊल टाकत असून उत्तम सरकार चालवत असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. त्यामुळे विरोध काय टीका करतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करतोत आणि टिकेला महत्त्व देत नाही.
या प्रसंगी आळंदी नगरपरिषदेचे सीईओ अंकुश जाधव,आळंदी देवस्थान ट्रस्टचे अभय टिळक, योगेश देसाई, सोहळा प्रमुख विकास ढगे, माजी जिल्हा प्रमुख राम गावडे, नगरसेविका शैला अविनाश तापकिर, शहरप्रमुख अविनाश तापकिर, विजयताई शिंदे, मंगलताई सोनवणे, उपशहर प्रमुख आनंद गोयल, पोलिस निरीक्षक मोहन यादव, उपनिरीक्षक जोंधळे, तम्मा विटकर, युवराज शिंगाडे आदी मान्यवर उपस्थित होते.