कोरोनामुळे आॅनलाईन सुविधांवर भर असावा-

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:09 AM2021-07-26T04:09:56+5:302021-07-26T04:09:56+5:30

पुणे : गणेशोत्सव आणि दत्तजयंती यापूर्वी मोठ्या थाटात साजरी केली जात होती. कोरोनामुळे यावर मर्यादा आल्या आहेत. भविष्यात मंदिरात ...

Corona should focus on online facilities- | कोरोनामुळे आॅनलाईन सुविधांवर भर असावा-

कोरोनामुळे आॅनलाईन सुविधांवर भर असावा-

Next

पुणे : गणेशोत्सव आणि दत्तजयंती यापूर्वी मोठ्या थाटात साजरी केली जात होती. कोरोनामुळे यावर मर्यादा आल्या आहेत. भविष्यात मंदिरात उपस्थित राहून प्रत्येक वेळी आपल्याला उपस्थित राहता येईलच, असे नाही. त्यामुळे सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने ऑनलाइन सुविधांवर भर असणे स्तुत्य असल्याचे मत महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.

बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे दत्तमंदिराच्या १२४ व्या वर्षी मंदिराच्या वेबसाइटचे उद्घाटन वळसे पाटील यांच्या हस्ते दत्तभवन येथे झाले. यावेळी दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रुकारी, कार्यकारी विश्वस्त डॉ. पराग काळकर, खजिनदार राजू बलकवडे, उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, उत्सव उपप्रमुख अ‍ॅड. रजनी उकरंडे, विश्वस्त युवराज गाडवे, अ‍ॅड. प्रताप परदेशी, महेंद्र पिसाळ आदी उपस्थित होते. या वेळी पूर्व विभागाचे सहपोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे व परिमंडळ १ च्या पोलीस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे यांच्याकडे पोलिसांसाठी आरोग्य सुरक्षा किट सुपूर्द करण्यात आले. हिमांशू रत्नपारखी यांनी वेबसाईटचे डिझाईन केले आहे.

डॉ. पराग काळकर म्हणाले, ‘ट्रस्टच्या संकेतस्थळामध्ये लाईव्ह दर्शन, नित्य उपक्रम, दत्त संप्रदाय व दत्तमंदिराचा इतिहास, सामाजिक उपक्रम व सर्व धार्मिक सेवांचा अंतर्भाव असणार आहे. यामुळे देश विदेशातील भाविक ट्रस्टशी जोडले जाणार आहेत.’

-----------------------

लक्ष्मी रस्त्याला कै. लक्ष्मीबाई हलवाई यांचे द्यावे

पुण्यात प्लेगने थैमान घातले होते, त्यावेळी लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांनी मोठी मदत केली होती. तेव्हा ब्रिटिश सरकारने रस्त्याला त्यांचे नाव दिले होते. त्यामुळे लक्ष्मी रस्त्याला कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई हे नाव शासनातर्फे देण्यात यावे, असे विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी यांनी सांगितले.

Web Title: Corona should focus on online facilities-

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.