कोरोना नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई वाढविणार : सरनोबत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:10 AM2021-02-07T04:10:50+5:302021-02-07T04:10:50+5:30
मागील आठवड्यात नीरा शहरात ५१ कोरोना रुग्ण ॲक्टीव्ह होते. त्यामुळे पुरंदरचे प्रशासन खडबडून जागे झाले. गुरवारी नीरा प्रथमिक आरोग्य ...
मागील आठवड्यात नीरा शहरात ५१ कोरोना रुग्ण ॲक्टीव्ह होते. त्यामुळे पुरंदरचे प्रशासन खडबडून जागे झाले. गुरवारी नीरा प्रथमिक आरोग्य केंद्रात तहसीलदार रुपाली सरनोबत यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्वला जाधव, नीरेचे प्रशासक एन.डी.गायकवाड, सर्कल संदीप चव्हाण, तलाठी बजंरग सोनवले, अप्पा लकडे, ग्रामसेवक मनोज डेरे, नीरा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक कैलास गोतपागार, सुरेश गायकवाड, प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. सागर डांगे, आरोग्य सहाय्यक गणेश जाधव, शिवाजी चव्हाण, माजी सरपंच राजेश काकडे, अनिल चव्हाण, विजय शिंदे, प्रमोद काकडे, भैय्यासाहेब खाटपे, मंगेश ढमाळ, अमोल साबळे, आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी सरनोबत म्हणाल्या की, नीरा शहरात मागील आठदहा दिवसात कोरोना रुग्णसंख्येत अचानक वाढ झाली. त्या अनुषंगाने आज काही प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक लावली. नीरेमध्ये व्यापारी वर्गामध्येच कोरोनाचा फैलाव अधिक झाल्याचा अहवाल आहे. त्यामुळे ज्या भागातील व्यापारी बाधित आढळले त्या परिसरातील इतर सर्व व्यापाऱ्यांची व त्यांच्या कुटुंबीयांची कोरोना चाचणी करण्यात येईल त्यासाठी त्यांना सूचना दिल्या आहेत.