कोरोनामुळे भोरच्या राजवाड्यात शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:09 AM2021-04-22T04:09:24+5:302021-04-22T04:09:24+5:30
भोर : सुमारे ३०० वर्षांची परंपरा असलेली भोरच्या पंतसचिवांची संस्थानकालीन श्रीराम नवमी कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी रद्द करण्यात आली ...
भोर : सुमारे ३०० वर्षांची परंपरा असलेली भोरच्या पंतसचिवांची संस्थानकालीन श्रीराम नवमी कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी रद्द करण्यात आली आहे. यामुळे एरवी गर्दीने फुलून जाणाऱ्या राजवाड्यात सर्वत्र शुकशुकाट आहे.
भोरचे पंतसचिव मागील ३०० वर्षांपासून अखंडपणे श्रीराम नवमी भोरच्या राजप्रसादात मोठ्या उत्साहात साजरी करीत होते. यासाठी शहरासह तालुक्यातील नागरिक उत्सव पाहण्यास गर्दी करत होते. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मागील वर्षी रामनवमी उत्सव रद्द केला होता. तर या वेळीही कोरोनामुळे श्रीराम नवमी उत्सव रद्द करण्यात आला आहे. यामुळे शहरातील राजवाड्यात आणि परिसरात शुकशुकाट आहे. तर भोरचे ग्रामदैवत जानाईदेवीची यात्राही कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे
कोरोनामुळे सुमारे ३०० वर्षाची परंपरा असलेली आणि संस्थानकालीन श्रीराम नवमी उत्सवाची परंपरा खंडित होत आहे.
श्रीराम नवमी रद्द झाल्याने भोरच्या संस्थानकालीन राजवाड्यात शुकशुकाट.
फोटो