पिंपरी चिंचवड शहरात कोरोना करतोय तरुणांना टार्गेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 01:26 PM2021-03-26T13:26:52+5:302021-03-26T13:27:37+5:30
२२ ते ३९ वयोगटातील नागरिकांनी काळजी घेण्याची गरज
पिंपरी - चिंचवड शहरात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढत आहे. शहरातील तरुण वयोगटाला सर्वाधिक लागण होत असल्याची स्थिती आहे. आता पर्यँत २२ ते ३९ या वयोगटातील ४१ टक्के नागरिकांना लागण झाली आहे. त्यामुळे तरुणांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
या वयोगटातील नागरिकांना मध्ये लक्षण विरहित रुग्णांचे प्रमाण हे जास्त आहे. गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी असले तरीही यांच्यामुळे इतरांना कोरोना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. सध्या आढळून येणाऱ्या रुग्णांमध्ये लक्षण विरहित आणि सौम्य स्वरूपाची लक्षणे असलेले रुग्ण जास्त आहेत. परंतु अशा रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे येत दिसून आहे.
गृहविलगीकरणात असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे ही संसर्ग होण्याचा धोका आहे. तरुण वयोगटातील नागरिक कामानिमित्त, नोकरीसाठी सर्वाधिक वेळ बाहेर असतात. त्यामुळे या वयोगटातील नागरिकांना सर्वाधिक लागण होत आहे. यांच्या माध्यमातून यांच्या परिवारातील व्यक्तींना लागण होते.
अनेक तरुण मास्क घालत नसल्याचे चित्र शहरातील रस्त्यांवर दिसून येत आहे. तरुणांची रोग प्रतिकारशक्ती चांगली असल्याने त्यांना मृत्यूचा धोका कमी असतो. कोरोनामुळे मृत्यू होणाचे प्रमाण हे ५५ वर्षांपुढील रुग्णांचे जास्त आहे. सध्या वाढत असलेला कोरोना तरुणांना टार्गेट करत असल्याने तरुणांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
मृत्यू होण्यात ज्येष्ठांचे प्रमाण अधिक
कोरोनाची सर्वाधिक लागण ही तरुणांना होत असली. तरीही मृत्यू होण्यामध्ये ५० पेक्षा जास्त वय असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण हे अधिक आहे. शहरात आता पर्यँत १९४३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जेष्ठ नागरिकांनाच जीव गमवावा लागला आहे.
मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. त्यामुळे सर्वच नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे
लक्षणे दिल्यास महापालिका केंद्रावर जाऊन तपासणी करून घ्यावी. कोरोना काळात ठेऊन दिलेल्या नियमांचे पालन करावे. यामुळे संसर्ग कमी होण्यास मदत होईल. असे अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी सांगितले आहे.
वयोगटानुसार आता पर्यँत झालेली लागण
० -१२ : ८६१२
१३ - २१ : १००१९
२२- ३९ : ५१५०३
४०- ५९ : ३८२३२
६० पेक्षा जास्त : १७१२९